पुरंदर शिक्षक पतसंस्थेच्या स्वीकृत संचालकपदी लवांडे, खवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:05+5:302021-07-10T04:09:05+5:30
सलीम मणेर आणि वर्षा खळदकर यांच्या राजीनाम्यामुळे संस्थेच्या मासिक सभेत ही निवड ...
Next
सलीम मणेर आणि वर्षा खळदकर यांच्या राजीनाम्यामुळे संस्थेच्या मासिक सभेत ही निवड करण्यात आली. या वेळी पतसंस्थेचे सभापती सतीश कुंजीर, शिक्षक समितीचे राज्य नेते महादेवराव माळवदकर, सुनील कुंजीर, वसंत कामथे, महिला अध्यक्षा मधुबाला कोल्हे, संचालक संदीप जगताप, गणेश कामठे, सुनील लोणकर, सुनील कांबळे, अविराज शिंदे, अनिल जगदाळे, संगीता हिंगणे, अलका रासकर, धनंजय साबळे, लतीफ इनामदार, जनार्दन कुंजीर, शिवाजी शितोळे उपस्थित होते. निवडीनंतर संस्थेच्या वतीने लवांडे आणि खवले यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन गणेश कामठे यांनी केले तर आभार संदीप जगताप यांनी मानले.
०९ सासवड लवांडे
०९ सासवड खवले