विधी, बीएड प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:11 AM2021-07-29T04:11:04+5:302021-07-29T04:11:04+5:30

गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यात विधी व बीएड अभ्यासक्रमाचे शुल्क इतर अभ्यासक्रमांच्या ...

Law, BEd admission process should be extended | विधी, बीएड प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी

विधी, बीएड प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ द्यावी

Next

गेल्या काही वर्षांपासून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. त्यात विधी व बीएड अभ्यासक्रमाचे शुल्क इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत कमी आहे. त्यातच अनेक विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र , जात वैधता प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्रक मिळू शकले नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्यात अडचणी येत आहेत. या कादपत्रांशिवाय विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत.

एलएलबी अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची मुदत २९ जुलै असून काही विद्यार्थी अजूनही अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दोन्ही अभ्यासक्रमाचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी,या मागणीचे निवेदन स्टुडेंट हेल्पिंह हॅण्डस संघटनेचे कुलदीप आंबेकर यांनी सीईटी सेलला दिले आहे.

--------------

Web Title: Law, BEd admission process should be extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.