नियमभंग करणा-यांची कुंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:41 AM2017-08-05T03:41:52+5:302017-08-05T03:41:52+5:30
वाहतुकीच्या नियमभंगाला सरावलेल्या महाभागांची कुंडली तयार करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नियमभंग करणा-यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
पुणे : वाहतुकीच्या नियमभंगाला सरावलेल्या महाभागांची कुंडली तयार करण्यास वाहतूक पोलिसांनी सुरुवात केली असून, पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नियमभंग करणा-यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपायुक्त अशोक मोराळे यांनी दिली.
गेल्या तीन महिन्यांपासून वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू आहे. तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अडीच लाख वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वारंवार नियमभंग करणाºयांची संख्या मोठी आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नियमभंग केलेल्या २ हजार वाहनचालकांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे.
या नोटिसा घेऊन पोलीस कर्मचारी स्वत: संबंधित वाहनचालकाच्या घरी जाणार
आहेत. त्यांच्याकडून जागेवरच दंड वसुली केली जाणार असल्याचे मोराळे यांनी सांगितले. येत्या काळात पाचपेक्षा कमी आणि एकापेक्षा अधिक वेळा नियमभंग करणाºयांविरुद्धही अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे.