"यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापर होतोय, मी अनावश्यक कलामांच्या विरोधात" - असीम सरोदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:28 PM2022-12-11T18:28:57+5:302022-12-11T18:29:11+5:30
शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले?
पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्यावर शाईफेक झाली. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दल संघटक मनोज घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय ओव्हाळ या तिघांना अटक केली. खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, घोषणाबाजी, मानहानी, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)/१३५ नुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी मध्यस्थी केली आहे. मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात असल्याचे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे.
सरोदे म्हणाले, कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा, इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही. चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे. ते गैरवर्तन आहे. मी अनावश्यक कलमांचा वापर करण्याचा विरोधात आहे. कलम 326 शस्त्राचा वापर करून गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यासाठी सुद्धा 10 वर्षे (किंवा जन्मठेप) अशी शिक्षा होऊ शकते. मग शाईफेकी साठी कलम 307 जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावायला सांगण्यात आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कुणावर तरी शाई फेकणे, बूट किंवा चप्पल मारून फेकणे हा राग व्यक्त करण्याचा,इन्स्टंट न्याय हवा असण्याचा प्रकार लोकशाहीत बसत नाही.चंद्रकांत दादांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण त्यांनी ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडले तो अभिव्यक्तीचा गैरवापर व चुकीची अभिव्यक्ती आहे, ते गौरवर्तन आहे.
— Asim Sarode (@AsimSarode) December 11, 2022
लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल
शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे. व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल. परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध असल्याचे ते म्हणाले आहेत.
शाइफेक प्रकरण-कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व 120 ब,आर्म्स ऍक्ट चा वापर अतिरेकीपणा आहे,यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल.परंतु शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध.#शाईफेक#बेतालनेतेpic.twitter.com/fQ7rwzVBVa
— Asim Sarode (@AsimSarode) December 11, 2022
हा न्यायतत्वाचा अपमान
शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे. पण म्हणून सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
शाईफेक प्रकरण म्हणजे गैरवर्तनाला गैरवर्तनाने उत्तर देण्याचा अराजकता निर्माण करण्याचा प्रकार आहे पण म्हणून सत्तेचा वापर करून अनावश्यक कलमे लावणे हा न्यायतत्वाचा अपमान आहे.
— Asim Sarode (@AsimSarode) December 11, 2022