अॅलोपॅथीच्या प्रॅक्टिसला कायद्याचे संरक्षण
By admin | Published: June 15, 2014 03:58 AM2014-06-15T03:58:13+5:302014-06-15T03:58:13+5:30
आयुर्वेद आणि युनानी पॅथीतील डॉक्टरांकडून केली जाणारी अॅलोपॅथीची प्रॅक्टिस कायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायद्यात राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या बदलाला विधिमंडळाने परवानगी दिली
Next
पुणे : आयुर्वेद आणि युनानी पॅथीतील डॉक्टरांकडून केली जाणारी अॅलोपॅथीची प्रॅक्टिस कायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक कायद्यात राज्य मंत्रिमंडळाने केलेल्या बदलाला विधिमंडळाने परवानगी दिली. या कायद्यामध्ये आयुर्वेदात पदव्युत्तर पदवी मिळविणाऱ्या डॉक्टरांना शल्यचिकित्सेसह अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) सातत्याने पाठपुरावा करून कायद्यात हा बदल करून घेतला.