सासवडला अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:10 AM2020-12-25T04:10:18+5:302020-12-25T04:10:18+5:30
पुरंदर तालुक्यातील मौजे दिवे येथील शंकर सोपान टिळेकर यांनी मारुती रामचंद्र औताडे (रा, दिवे) यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. नोहेंबर ...
पुरंदर तालुक्यातील मौजे दिवे येथील शंकर सोपान टिळेकर यांनी मारुती रामचंद्र औताडे (रा, दिवे) यांच्याविरूद्ध तक्रार केली आहे. नोहेंबर १९ ते दिनांक २१ डिसेंबर दरम्यान हा गुन्हा घडला आहे. मारुती रामचंद्र औताडे यांचेकडे सावकारीचे लायसन्स नसताना त्याने टिळेकर यांना उसने दिलेले १० लाख रुपयांच्या मोबदल्यात जमीन गट नंबर १५६ मधील १५ गुंठे जमीन ज्याची किंमत ५७ लाख रुपये आहे ती खरेदी करून घेतली. तसेच ती परस्पर लहुजी गंगाराम भापकर यांना विकली. जमीन परत मागितली असता दमदाटी करून व्याजासह ५५ लाख रुपयाची मागणी केली. टिळेकर यांनी या विरोधात सासवड पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस निरीक्षक ए बी घोलप पुढील तपास करीत आहेत.
कोट
सावकारी विरोधात आमची मोहीम चालू आहे. फिर्यादीने सर्व प्रकारची माहिती दिली. त्याची खात्री करून पुरंदर तालुक्यात सावकारीचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. अश्या प्रकारे सावकारी संदर्भात कोणालाही त्रास होत असेल तर आमच्याशी संपर्क करा, माहिती द्या, माहितीची खात्री करून त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-धनंजय पाटील, उप विभागीय अधिकारी