कायदा अस्तित्वात येणे ग्राहक चळवळीचे यश
By admin | Published: January 23, 2017 02:21 AM2017-01-23T02:21:36+5:302017-01-23T02:21:36+5:30
माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात येणे हे ग्राहक संरक्षण चळवळीचे यश आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त
इंदापूर : माहिती अधिकाराचा कायदा अस्तित्वात येणे हे ग्राहक संरक्षण चळवळीचे यश आहे, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
इंदापूर महाविद्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्व. संतोष (बापू) गांधी स्मृती पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड या वेळी उपस्थित होते. इंदापूर महाविद्यालयात हा कार्यक्रम झाला. पाटील म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा जनतेला १०० टक्के लागू होतो. आपले हक्क, फसवणूक याविरुद्ध संरक्षणाकरिता तो प्रभावीपणे राबविणे महत्त्वाचे आहे. तरुण वर्गामध्ये या कायद्याची जागृती होण्यासाठी संघटना कार्यरत आहे ही महत्त्वाची बाब आहे.
धनंजय गायकवाड म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करुन, कर्तव्याच्या जाणिवेतून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे बळकटीकरण करावे. प्रत्येक क्षेत्रात संघटन आहे, मात्र ग्राहकांचे संघटन नाही. यासाठी हा कायदा प्रत्यक्षात राबवावा. आपले हीत साध्य करावे.
किशोर भोईटे, नितीन मिंड, ज्ञानेश्वर रायते यांनी मनोगत व्यक्त केले. कॉमर्स व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ह्यतुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकारह्ण हे पथनाट्य सादर करण्यात आले.
सूत्रसंचालन सुधीर भिसे यांनी केले. प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव मुकुंद शहा, पंचायत समितीचे सभापती विलास वाघमोडे, मंगेश पाटील, तुकाराम जाधव, ग्राहक पंचायत पुणे जिल्हा संघटक तुषार झेंडे, सचिव दिलीप निंबाळकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. बाळासाहेब काळे, प्रा. सदाशिव उंबरदंड, प्रा.गौतम यादव, प्रा.रोहित लोंढे यांनी प्रयत्न केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुक्यास उत्कृष्ट संघटक, ज्ञानेश्वर रायते यांना हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्व. संतोष (बापू) गांधी स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.(वार्ताहर)