विना मास्क फिरणाऱ्यांवर सासवडला कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:08 AM2020-12-07T04:08:18+5:302020-12-07T04:08:18+5:30
सासडव : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर सासवड पोलिसांनी कारवाई करत दोन दिवसांत तब्बल २३ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला. ...
सासडव : शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर सासवड पोलिसांनी कारवाई करत दोन दिवसांत तब्बल २३ हजार १०० रूपयांचा दंड वसूल केला. नागरिकांनी शासनाचे सर्व नियम पाळून काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सासवडला कोरोना बाबत असलेले गांभिर्य कमी झाले आहे. नागरिक विनामास्क शहरात फिरत आहेत. यामुळे कोरोनानियमांची तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर साडवड पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाईचा बडगा उचलला आहे. शनिवारी (दि ५) विनामास्क फिरणाऱ्या ६० जणांना ६००० रुपये दंड आकारण्यात आला तर याच दिवशी वाहातुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवणाऱ्या २८ जणांकडून ७००० रूपये दंड वसूल करण्यात आला. तर रविवारी (दि ६) विनामास्क फिरणाऱ्या ७५ नागरिकांना ७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या ३७ जणांकडून १० हजार १०० रूपये दंड वसुल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांनवर कठोर कारवाई करावी करण्यात येणार आहे. नागरीकांनी स्वत:हुन दक्षता घेतली तर पोलिस प्रशासनावर ताण येणार नाही. या साठी विनामास्क फिरु नका, असे आवाहन सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी केले आहे.