लाच मागितल्याच्या आरोपावरून जुन्नरमध्ये वकिलाला अटक, एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:09 PM2023-12-29T19:09:31+5:302023-12-29T19:11:04+5:30

२० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जूनरमधील वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे...

Lawyer arrested in Junnar on charges of asking for bribe, ACB action | लाच मागितल्याच्या आरोपावरून जुन्नरमध्ये वकिलाला अटक, एसीबीची कारवाई

लाच मागितल्याच्या आरोपावरून जुन्नरमध्ये वकिलाला अटक, एसीबीची कारवाई

जुन्नर (पुणे) : गुन्ह्यात अटक झालेल्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, पोलिस अधिकाऱ्याला द्यावे लागतील, असे सांगून २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जून्नरमधील वकिलावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

शिवम गजानन नायकोडी (वय ३०) असे या वकिलाचे नाव आहे. यासंदर्भात माहिती अशी की, तक्रारदार हे ७० वर्षांचे असून त्यांच्या मुलाला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जुन्नर पोलिसांनी अटक केली होती. शिवम नायकोडी हे त्यांचे वकील होते. त्यांच्या मुलाला लवकर जामीन मिळवून देतो, असे तक्रारदार यांना सांगितले. त्यासाठी तपास अधिकाऱ्याला २५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याची ९ डिसेंबर रोजी पडताळणी केली असता वकिलाने तपासी अधिकाऱ्याला २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून तक्रारदाराकडे पंचासमक्ष २० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. वकिलाने लाच मागितली तरी त्यात तपासी अधिकाऱ्याचा सहभाग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला आढळून आला नाही. लाच मागितल्यानंतर तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणीही झाली होती.

मात्र, कारवाईदरम्यान तक्रारदार यांचे १७ डिसेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे सापळा कारवाई होऊ शकली नाही; परंतु लाच मागितली गेली असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रूपेश जाधव, पोलिस अंमलदार माने, कोमल शेटे आणि चालक पोलिस हवालदार कदम यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Lawyer arrested in Junnar on charges of asking for bribe, ACB action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.