रवींद्र बर्हाटेला मदत करणे वकिलाला भोवले; अॅड. सुनिल मोरेला गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 08:41 PM2021-07-03T20:41:27+5:302021-07-03T20:42:05+5:30
फसवणूक करुन जमिनी बळकाविण्याबरोबरच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बर्हाटे टोळीवर १२ गुन्हे दाखल आहेत
पुणे : फसवणूक व जमिनी बळकावून फरार झालेल्या रवींद्र बर्हाटे याला मदत करणे वकिलाला भोवले आहे़ पत्नी, मुलापाठोपाठ गुन्हे शाखेने वकिलालाही अटक केली आहे.
अॅड. सुनिल अशोक मोरे (वय.49,रा.बिबवेवाडी) असे वकिलाचे नाव आहे. फसवणूक करुन जमिनी बळकाविण्याबरोबरच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बर्हाटे टोळीवर १२ गुन्हे दाखल आहेत. गेल्या दीड वर्षांपासून बर्हाटे फरार आहे. त्याला मदत करणे तसेच त्याच्याशी संपर्क असल्याच्या आरोपावरुन गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी त्याची पत्नी संगीता बर्हाटे यांना अटक केली होती. त्यानंतर दुसर्याच दिवशी त्याचा मुलगा मयुर बर्हाटे याला अटक केली होती. या दोघांकडे केलेल्या चौकशीत बर्हाटे याला मदत करण्यात अॅड. मोरे याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज गुन्हे शाखेने अॅड. सुनिल मोरे याला अटक केली आहे.