रवींद्र बऱ्हाटेला मदत करणे वकिलाला भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:08 AM2021-07-04T04:08:14+5:302021-07-04T04:08:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : फसवणूक व जमिनी बळकावून फरार झालेल्या रवींद्र बऱ्हाटे याला मदत करणे वकिलाला भोवले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : फसवणूक व जमिनी बळकावून फरार झालेल्या रवींद्र बऱ्हाटे याला मदत करणे वकिलाला भोवले आहे. बऱ्हाटेच्या पत्नी, मुलापाठोपाठ गुन्हे शाखेने वकिलालाही अटक केली आहे.
अॅड. सुनील मोरे असे या वकिलाचे नाव आहे. फसवणूक करून जमिनी बळकाविण्याबरोबरच खंडणी वसूल केल्याप्रकरणी रवींद्र बऱ्हाटे टोळीवर १२ गुन्हे दाखल आहेत. गेल्या दीड वर्षापासून बऱ्हाटे फरार आहे. त्याला मदत करणे तसेच त्याच्याशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी त्याची पत्नी संगीता बऱ्हाटे यांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा मुलगा मयूर बऱ्हाटेला अटक केली होती. या दोघांकडे केलेल्या चौकशीत बऱ्हाटेला मदत करण्यात अॅड. मोरेचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी (दि. ३) गुन्हे शाखेने अॅड. सुनील मोरे याला अटक केली आहे.