Pimpri Chinchwad: पोलिस भरतीसाठी वकील, डाॅक्टर अन् इंजिनिअरही शर्यतीत; १५ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 10:24 AM2024-06-21T10:24:42+5:302024-06-21T10:26:06+5:30

रोजगारीमुळे हे सर्वच जण पोलिस शिपाईपदी संधी मिळण्याच्या अपेक्षेने भरतीसाठी शहरात दाखल होत आहेत...

Lawyers, doctors and engineers also in the race for police recruitment; 15 thousand applications | Pimpri Chinchwad: पोलिस भरतीसाठी वकील, डाॅक्टर अन् इंजिनिअरही शर्यतीत; १५ हजार अर्ज

Pimpri Chinchwad: पोलिस भरतीसाठी वकील, डाॅक्टर अन् इंजिनिअरही शर्यतीत; १५ हजार अर्ज

पिंपरी :पोलिस दलातील भरतीप्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीला बुधवारपासून (दि. १९) सुरुवात झाली असून, यात बारावी उत्तीर्ण झालेल्यांसह उच्चशिक्षित तरुणही ‘चान्स’ घेत आहेत. बेरोजगारीमुळे हे सर्वच जण पोलिस शिपाईपदी संधी मिळण्याच्या अपेक्षेने भरतीसाठी शहरात दाखल होत आहेत.

राज्यात पोलिस दलात विविध संवर्गातील १७ हजार पदांची भरती सुरू आहे. त्यात पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई या पदाच्या २६२ जागांसाठी १५ हजार ४२ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या उमेदवारांच्या शारीरिक चाचणीला बुधवारी सुरुवात झाली. या भरतीत सहभागी होणारे अनेक उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. यात कुणी वकील, कुणी डाॅक्टर, एमफार्मसी, एमटेक, एमए, बीएस्सी, हे कमी की काय काहीजण तर इंजिनिअर सुद्धा आहेत.

खासगी क्षेत्रात नोकरीची हमी नाही

भरतीसाठी आलेले बहुसंख्य तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. उच्चशिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याने तसेच खासगी क्षेत्रात नोकरीची हमी नाही, अशा परिस्थितीत पोलिस भरतीची संधी चालून आली आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण इयत्ता बारावी उत्तीर्ण या शिक्षणाच्या अटीवर होणाऱ्या पोलिस शिपाई पदाच्या शर्यतीत धावत आहे.

शिपाई का असेना; पण सरकारी नोकरी

शिपाई का असेना पण नोकरी सरकारी मिळतेय ना, मग प्रयत्न करायला काय हरकत आहे? याच मानसिकतेत अनेक तरुण आहेत. बेरोजगारी वाढत असून, ती एक सामाजिक समस्या बनली आहे, त्यामुळे उच्चशिक्षित तरुण पोलिस भरतीसाठी ठिकठिकाणी जात असल्याचे उमेदवारांच्या बोलण्यातून जाणवले.

सव्वापाच हजार पदवीधारक, तर ८०० पदव्युत्तर पदवीधारक

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत शिपाई पदासाठी बारावी उत्तीर्ण असलेल्या ९१०४ उमेदवारांनी अर्ज केला, तर आर्मड फोर्स १०१, बीफार्म २९, बीए २८४९, बीए सोशल वर्क ३, बीए सामाजिक शास्त्र ३, बीएए ७, बीएबीएड २, बीएएमएस १, बीबीए ५७, एमबीए १, बीसीए १३७, बीसीएम ५, बीकाॅम १३६१, बीई २७४, बीएड ४, बीएफए १, बीएमएस १, बीपीएड८, बीपीएमटी १, बीएसएलएलबी १, बीएसस्सी ९४८, बीएसस्सी ॲग्री १११, बीएसस्सी टेक १६, बीएसस्सी एचएलएस २१, बीटेक ॲग्री ९, बीटेक ५६, बॅचलर ऑफ फोल्क आर्टस १, बॅचलर ऑफ इंटेरियर १, बीसीएस ११८, बीएडब्ल्यू ८, एलएलबी ७, एमकाॅम १७३, एमफार्म २, एमए ३१७, एमएएज्यू. ६, एमए एमएसडब्ल्यू २, एमए सोशल वर्क ७, एमबीए ९३, एमसीए २५, एमसीएस २२, एमई २, एमएड २, एमलीब १, एमलीब सायन्स ३, एमपीएड ३, एमएसडब्ल्यू २, एमएसस्सी ॲग्री २, एमएसस्सी टेक १, एमटेक ३, मास्टर ऑफ कम्प्युटर मॅनेजमेंट १, मास्टर ऑफ सोशल वेल्फेअर २, एमएलएस १.

Web Title: Lawyers, doctors and engineers also in the race for police recruitment; 15 thousand applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.