पिरंगुटच्या उपसरपंचपदी लक्ष्मण निकटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:14 AM2021-02-17T04:14:55+5:302021-02-17T04:14:55+5:30
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील औद्योगिकनगरीची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पिरंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच लक्ष्मण गणपत निकटे यांची बिनबिरोध निवड ...
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील औद्योगिकनगरीची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या पिरंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच लक्ष्मण गणपत निकटे यांची बिनबिरोध निवड करण्यात आली आहे.
याआधीच्या उपसरपंच सुरेखा पवळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच सुरेखा पवळे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. या निवडीसाठी सरपंच चांगदेव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. यामध्ये लक्ष्मण निकटे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची पिरंगुट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे यांनी काम पाहिले.
तेव्हा सरपंच चांगदेव पवळे, मावळत्या उपसरपंच सुरेखा पवळे, माजी उपसरपंच रामदास गोळे, विकास पवळे, प्रवीण कुंभार, ग्रा. सदस्य राहुल पवळे, अंकुश खडके, माजी उपसरपंच अश्विनी निकटे, छाया पवळे, रेश्मा पवळे, सुवर्णा नवाळे, सदस्या सारिका केदारी उपस्थित होते.
फोटो ओळ: नवनिर्वाचित उपसरपंच लक्ष्मण निकटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.