‘नाळेचं नातं जपणं लक्ष्मीपुत्रांनाच शक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:57 AM2018-06-20T00:57:30+5:302018-06-20T00:57:30+5:30

पूर्वीच्या काळी नवजात बालकांची नाळ जपून ठेवली जायची. बाळ थोडंसं मोठं होईपर्यंत त्याच्या आजारात ही नाळ कामाला यायची.

Laxmikantra only possible with the bridegroom's relationship! | ‘नाळेचं नातं जपणं लक्ष्मीपुत्रांनाच शक्य!

‘नाळेचं नातं जपणं लक्ष्मीपुत्रांनाच शक्य!

googlenewsNext

- शब्दाली जवळकोटे-प्रधान
पुणे : पूर्वीच्या काळी नवजात बालकांची नाळ जपून ठेवली जायची. बाळ थोडंसं मोठं होईपर्यंत त्याच्या आजारात ही नाळ कामाला यायची. मात्र, अलीकडच्या काळात स्टेम सेल नावाची अत्याधुनिक प्रक्रिया वैैद्यकीय शास्त्रात प्रगत झाली असली तरी आजही केवळ श्रीमंत वर्गासाठीच उपलब्ध होत आहे. या प्रक्रियेचे दर अर्ध्या लाखाच्या जवळपास असल्यामुळे इच्छा असूनही सर्वसामान्य मध्यमवर्गीय आपल्या मुलाची नाळ कायमस्वरूपी जपू शकत नाहीत.
स्टेम सेल प्रक्रिया गेल्या पंधरा ते वीस वर्षांत विकसित झाली आहे. बाळाच्या जन्मानंतर त्याच्या नाळेतील रक्तात जे पेशी सापडले जातात, त्याला स्टेम सेल व कॉड ब्लड सेल म्हटले जाते. या पेशींमध्ये नवीन रक्त आणि रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याची ताकद असते. तर या पेशी कोणत्याही प्रकारच्या पेशी तयार करु शकतात. त्यामुळे संशोधक सर्व आजारांवर या स्टेम सेलचा प्रयोग करत आहेत.
या पेशींपासून रक्ताचा कर्करोग, स्वादुपिंड व फुप्फुसाच्या रोगांवर, तसेच पॅरालायसिस, मतिमंदपणा, ब्रेन ट्युमर, रक्तवाहिन्यांना होणारा रोग थॅलेसिमिया, स्नायूला होणारा रोग सेरेब्रल पाल्सी अशा अनेक रोगांवर या पेशींनी आत्तापर्यंत मात केली आहे. त्याप्रमाणेच एड्स, हदयविकार, रक्तासंबंधीचे रोगांवर स्टेम सेल पेशींचा प्रयोग केला जात आहे.
बाळाच्या जन्मानंतर त्याची नाळ जपून ठेवण्यासाठी खासगी बँकाही आल्या आहे. तर या बँकात जवळपास ४0 ते ७0 हजार रुपये लागत असल्याने श्रीमंतच तंत्रज्ञानाचा उपयोग घेतात. परंतु मध्यवर्गीय लोकांना हा खर्च आवाक्याबाहेर असल्यामुळे त्यांच्या बाळांना या तंत्रज्ञानाचा लाभ घेता येत नाही. भारतात केवळ दोन टक्केच लोकांना स्टेम सेल जपून ठेवण्याविषयी माहिती असल्यामुळे बाकी लोक या तंत्रज्ञानापासून अज्ञात आहेत. या बँका बाळाची नाळ २५ वर्षांपर्यंतच जपून ठेवतात. या स्टेम सेलचा उपयोग बाळाचे आई, वडील, भाऊ, बहीण व आजी, आजोबा तसेच नातेवाईकांनाही ंहोऊ शकतो.
१९८८ मध्ये फ्रान्समधील पॅरिसमधील सहा वर्षांच्या मुलावर रक्त आणि प्रथिन पेशींचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पहिली कॉर्ड ब्लड सेलचा यशस्वी प्रयोग करण्यात आला व त्यानंतर या पेशींच्या बँकाही स्थापन करण्यात आल्या. तर भारतामध्येही स्टेम सेलाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यामध्ये खाजगी बँकांचा मोठा समावेश भारतात दिसून येतो. भारतामध्ये सध्या हे तंत्रज्ञान संशोधनाच्या पातळीवर असल्याने त्याबाबत जनजागृती झालेली नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
>अद्याप प्रसार नाही
स्टेम सेल या तंत्रज्ञानाचा जर लोकांनी फायदा घेतला, तर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही आजारावर मात होऊ शकते. परंतु सद्यस्थितीत या तंत्रज्ञानाचा प्रसार जास्त झाला नसल्याने पुष्कळ लोक या तंत्रज्ञानापासून अज्ञात आहेत. लोकांनी याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवून त्याचा फायदा घ्यावा. तसेच कॉर्ड ब्लड सेलच्या खासगी बँकामध्ये स्टेम सेल ठेवत असताना कंपनीच्या योजना पाहूनच त्याचा फायदा घ्यावा. - डॉ. रुपेश काटकर
>हर्षिता अग्रवाल ही थॅलेसिमिया आजारापासून पीडित होती. तिचा स्वत:चा बोनमॅरो खराब असल्यामुळे जिवंत राहण्यासाठी दर महिन्याला तिला बाहेरून रक्त दिले जात होते. डॉक्टरांच्या प्रयत्नांतून तिच्यावर स्टेम सेल प्रक्रिया केली. तिच्या भावाच्या कॉर्ड ब्लड सेलमधून तिचा थॅलेसिमिया हा रोग बरा करण्यात आला.

Web Title: Laxmikantra only possible with the bridegroom's relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.