'पीएमपीएल'ला मिळाला नवा अध्यक्ष; लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या खांद्यावर जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 08:11 PM2021-07-09T20:11:15+5:302021-07-09T20:19:19+5:30
राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता.
पुणे : राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या( पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार बुधवारी( दि.३० ) सोडला होता. त्यानंतर जगताप यांच्यानंतर पीएमपीएल ची सूत्रे कुणाकडे दिली जाणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र, राज्य शासनाकडून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची पीएमपीएल नवे अध्यक्ष म्हणून शुक्रवारी( दि.९) नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मिश्रा हे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी सांभाळत आहे.
डॉ राजेंद्र जगताप यांनी 24 जुलै 2020 रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. 11 महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीएच्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, केंद्र सरकारच्या फेज 2 या अंतर्गत इ बस सेवा सुरू करणे, पुणे विमानतळ हुन वातानुकूलित 'अभी' नावाची बस सेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्याचा 11 महिन्याचा कार्यकाळ गाजला. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरणार याच्या कडे पीएमपी चा पदभार देण्यात आला आहे
राजेंद्र जगताप यांनी संरक्षण दलातून प्रतिनियुक्ती घेऊन पीएमपीचा पदभार स्वैपाकारला होता. 30 जून हा रोजी त्यांना मुदतवाढी चे पत्र येणे अपेक्षित होते.मात्र शासनाकडून पत्रच न आल्याने डॉ जगताप यांनी बुधवारी आपला पदभार सोडला होता. यानंतर लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे पीएमपीएलच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.