पीएमपीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा; तर आदिवासी विकास आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:09 AM2021-07-10T04:09:49+5:302021-07-10T04:09:49+5:30

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ. राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा ...

Laxminarayan Mishra as PMP president; While Dr. Tribal Development Commissioner. Rajendra Bharud | पीएमपीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा; तर आदिवासी विकास आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड

पीएमपीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रा; तर आदिवासी विकास आयुक्तपदी डॉ. राजेंद्र भारूड

Next

राज्य सरकारने मुदतवाढ न दिल्याने डॉ. राजेंद्र जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) अध्यक्षपद व व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार नुकताच सोडला होता. त्यानंतर जगताप यांच्यानंतर पीएमपीएलची सूत्रे कोणाकडे देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर शुक्रवारी रात्री राज्य शासनाने ७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.

डॉ. राजेंद्र जगताप यांनी २४ जुलै २०२० रोजी पीएमपीच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. ११ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात पाच रुपयांत पाच किमी प्रवास देणारी अटल बससेवा योजना, पीएमआरडीएच्या हद्दीत नव्या मार्गावर बससेवा सुरू करून पीएमपीचे उत्पन्न वाढविले, बंद झालेली कात्रज ते स्वारगेट बीआरटी वाहतूक पुन्हा सुरू केली. केंद्र सरकारच्या फेज-२ या अंतर्गत ई-बस सेवा सुरू करणे, पुणे विमानतळहून वातानुकूलित ''अभी'' नावाची बससेवा सुरू करणे यासह कर्मचारी हिताचे निर्णय घेतल्याने पीएमपीचा त्याचा ११ महिन्यांचा कार्यकाळ गाजला.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आलेला.

------------------------------

फोटो :

१) लक्ष्मीनारायण मिश्रा

२) डॉ. राजेंद्र भारूड

Web Title: Laxminarayan Mishra as PMP president; While Dr. Tribal Development Commissioner. Rajendra Bharud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.