छगन भुजबळांसारखा नेता जेलबाहेर आलाच पाहिजे; दिलीप कांबळेंचं धक्कादायक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:38 PM2017-11-28T12:38:27+5:302017-11-28T13:51:22+5:30
छगन भुजबळ एक लढवय्ये नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता जेलबाहेर आलाच पाहिजे असं धक्कादायक वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलं आहे.
पुणे - छगन भुजबळ एक लढवय्ये नेते आहेत. त्यांच्यासारखा नेता जेलबाहेर आलाच पाहिजे असं धक्कादायक वक्तव्य समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी केलं आहे. 'भुजबळांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना. कायदेशीर लढाई लढून ते लवकरच बाहेर येतील', असा विश्वासही दिलीप कांबळे यांनी व्यक्त करुन टाकला आहे. दिलीप कांबळे यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महात्मा फुलेंच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना दिलीप कांबळे यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे.
'ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना जामीन मिळत नव्हता ते कलम रद्द झाल्याने आता छगन भुजबळ लवकरच बाहेर येतील. छगन भुजबळ हे लढवय्ये नेते आहेत. ते कायद्याच्या कचाट्यात अडकले, मात्र लवकरच ते जेलबाहेर येतील. भुजबळांना लवकर जामीन मिळावा ही ईश्वर चरणी प्रार्थना', असं दिलीप कांबळे बोलले आहेत.
महाराष्ट्र सदन, इंडिया बुल्स आदी प्रकरणांत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल असलेल्या तीन गुन्ह्य़ांप्रकरणी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना सक्तवसुली महासंचालनालयाकडून(ईडी) 14 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली . तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर भुजबळ यांना भारतीय दंडविधान १९/१ काळापैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या वेगवेगळ्या मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सरकारला तब्बल 880 कोटी रुपयांचा फटका बसला. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अनेक गैरव्यवहारांच्या प्रकरणांपैकी फक्त या एकाच प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचलनालय करत आहे.
भुजबळ कुटुंबावर झालेली कारवाई
१२ डिसें.२०१५ ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती

१२ डिसें.२०१५ : ईडीकडून प्राइम डेव्हलपर्सची चौकशी
२२ डिसेंबर : ईडीकडून वांद्रा येथील खुला भूखंड व सांताक्रुझमधील नऊ मजली इमारत, अशी ११० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
१३ जानेवारी : भुजबळ यांना क्लीन चिट नाही - मुख्यमंत्री
२८ जानेवारी : भुजबळांसह कुुटुंबीयांवर महिन्याभरात आरोपपत्र, एसीबीची हायकोर्टाला माहिती
१ फेब्रु.२०१६ : छगन भुजबळ अमेरिकेला रवाना. भुजबळ यांच्याशी संबंधित ९ मालमत्तांवर ईडीचे छापे. समीर भुजबळची ईडीकडून दिवसभर चौकशी. समीर यांना रात्री उशिरा अटक.
२ फेब्रुवारी : भुजबळांवरील कारवाई सूडबुद्धीने - शरद पवार
२४ फेब्रुवारी: भुजबळांवर आरोपपत्र दाखल
८ मार्च : ईडीचे छगन भुजबळ यांना समन्स, १४ मार्चला हजर राहण्याची सूचना
१४ मार्च - छगन भुजबळांना अटक