विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्याकडून पिंपरी शहरातील कोरोना परिस्थिती,उपाययोजनांचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 01:14 PM2020-06-23T13:14:51+5:302020-06-23T13:19:36+5:30

मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाला 100 हुन अधिक रुग्णांची भर पडत आहे.

Leader of Opposition Devendra Fadnavis reviews Corona situation and measures in Pimpri city | विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्याकडून पिंपरी शहरातील कोरोना परिस्थिती,उपाययोजनांचा आढावा

विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांच्याकडून पिंपरी शहरातील कोरोना परिस्थिती,उपाययोजनांचा आढावा

Next
ठळक मुद्देशिस्तप्रिय भाजपकडून फिजिकल डिस्टन्स चे तीनतेरामोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित

पिंपरी : महानगरपालिका परिसरातील कोरोना साथ आजाराचा आढावा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी मंगळवारी दुपारी घेतला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयास भेट दिली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पावणे एकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयाला भेट दिली.  यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहराध्यक्ष व भोसरीचे आमदार महेश लांडगे, माजी खासदार, राज्यसभा सदस्य अमर साबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे,  प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे आदी उपस्थित होते.

पिंपरीतील वायसीएम रुग्णालय हे कोरोना रुग्णासाठी समर्पित केले आहे. त्यामुळे याठिकाणी फक्त कोरोना रुग्णांना प्रवेश दिला जातो.  पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना विषयीची माहिती घेण्यासाठी फडणवीस हे आले होते. दुपारी साडेबाराची वेळ असल्याने भाजपचे कार्यकर्ते दुपारी बारापासून हॉस्पिटलमध्ये गर्दी करून होते. फडणवीस यांचे पावणे एकच्या सुमारास आगमन झाले होते. त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स इन चे तीन तीन तेरा वाजले होते.
देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील कोरोनाची परिस्थिती, महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती घेतली. वायसीएम रुग्णालय हे साठी समर्पित केले आहे. दरम्यान, फडणवीस यांचे आगमन होताच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली. त्यामुळे केल्याने सुरक्षित अंतर, फिजिकल डिस्टनचा मात्र फज्जा उडाला. 
शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात दिवसाला 100 हुन अधिक रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

Web Title: Leader of Opposition Devendra Fadnavis reviews Corona situation and measures in Pimpri city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.