पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:37 AM2020-11-22T09:37:52+5:302020-11-22T09:37:52+5:30
पुणे - दिवाळी निमित्ताने महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती च्या वतीने कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले. वैकुंठधाम येथील ...
पुणे - दिवाळी निमित्ताने महाराष्ट्र पोलीस मित्र समन्वय समिती च्या वतीने कपडे, मिठाईचे वाटप करण्यात आले. वैकुंठधाम येथील कर्मचारीवर्ग, सारसबागेसमोरील फुगे विकणारे मुले, मार्केटयार्ड परिसरातील रस्त्यावर फुले विकणारे मुले, जिजामाता उद्यान समोरील गरीब व्यक्ती, खडकमाळ भागातील अंधव्यक्तीसाठी तसेच बुधवारपेठेतील तृतीयपंथी आदींना कपडे व मिठाई वाटप करुन आनंदाचा सण साजरा करण्यात आला. उपमहापौर सरस्वती शेंडगे, अनंतलक्ष्मी कैलाशन, वर्षा तांबोळी, मनिषा निंबाळकर, शिरीष मोहिते, पंकीश ठक्कर आदींनी सहभाग घेतला.
--------///
बँकांनी खातेदारांची गळचेपी करू नये
पुणे : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेच्या नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ येथील शाखा ज्येष्ठ नागरिक व निवृत्त कर्मचाऱ्यांची गळचेपी करतात. ती त्यांनी करू नये असे आवाहन ग्राहक मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब शिनगारे यांनी केले.
संघाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक राजा भोसले, गीताली खरात, डॉ. अभय देवधर, अन्वर शेख, डॉ. वैशाली चव्हाण उपस्थित होते.
......
हिंदूमहासभेकडून कपिल कोळी यांना उमेदवारी
पुणे : अखिल भारत हिंदू महासभा, सोलापूर शाखेच्या वतीने पुणे पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. पदवीधरांसाठी विशेष आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, बेरोजगार भत्ता मिळावा, पदवीधरांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत प्राधान्य द्यावे. आदी मुद्दे घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. असे कोळी यांनी सांगितले.
--------
जागतिक शौचालय दिन साजरा
पुणे : महानगरपालिका आणि शेल्टर असोसिएटसच्या वतीने साजरा करण्यात आला.
लक्ष्मीनगर, कोथरूड वॉर्ड येथे विविध उपक्रम, स्पर्धा आणि सत्कारांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाग अधिकारी आशा राऊत, असोसिएटसच्या संचालिका प्रतिमा जोशी, स्वच्छता निरीक्षक सचिन लोकरे, राजा गायकवाड , बाळू दांडेकर आणि नागरिक उपस्थित होते.
एक घर एक शौचालय या उपक्रमातून राज्यातील सात शहरांमधील वस्त्यांमध्ये २१ हजार पेक्षा अधिक वैयक्तिक शौचालयाची सोय करण्यात आली आहे. पुण्यात पाच हजार शौचालये पूर्ण केली आहे. कार्यक्रमाची सुरुवात तरुणांनी सादर केलेल्या पथनाट्याने करण्यात आली. असे जोशी यांनी सांगितले.