खर्चिक असूनही इंग्रजीकडे ओढा
By admin | Published: May 12, 2017 05:14 AM2017-05-12T05:14:12+5:302017-05-12T05:14:12+5:30
मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी, सध्या पालकांची मोठ्याप्रमाणात धावपळ सुरु आहे. आर्थिक परिस्थिती नसतांनाही बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असल्याचे दिसुन येते.
आपल्याला जे मिळाले नाही ते आपल्या मुलांना मिळावे, या मानसिकतेतुन पालकांचा मोठ्याप्रमाणात कल हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे आहे. परंतु, इंग्रजी भाषा ही काळाची गरज असली तरीही, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मातृभाषेतुन मिळणारे शिक्षण हे जास्त गरजेचे आहे असे शहरातील काही पालक संघटना, शिक्षक संघटना व प्राचार्य यांचे मत आहे.
एखादी गोष्ट समजुन घेण्यासाठी व ती चिरकाल लक्षात राहण्यासाठी मातृभाषेतुन ती समजुन घेणे जास्त महत्त्वाचे असते. आपल्याकडे इंग्रजीचे अनावश्यक फॅड वाढत चालले आहे. त्यामुळे विद्यार्थी विषय समजुन न घेता केवळ घोकंपट्टीच करतात . सध्या मराठी माध्यमांच्या शाळांची पटसंख्या कमी होत आहे. पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे धाव घेऊ लागले आहेत.
सीबीएसइ व आयसीएसइ यांची संलग्नता मिळविण्यासाठी खासगी शाळा प्रयत्नशील आहेत. परंतु, घरी विद्यार्थ्याच्या कानावर न पडलेल्या भाषेत त्यांना एकदम प्राथमिक शिक्षण दिले तर त्यांच्या शिकण्याच्या पध्दतीवर विपरीत परीणाम होतो. सुरूवातीची सात-आठ वर्षे शिक्षण मातृभाषेतून मिळाले तर दोन्ही भाषा मुले अधिक चांगल्या प्रकारे अवगत करु शकतात. असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.