पुणे विद्यापीठात इस्राईलच्या राजदूताचे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 07:23 PM2018-06-30T19:23:14+5:302018-06-30T19:24:20+5:30

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्ये भारतातील इस्राईलचे राजदूत डॅनियल कार्मन यांचे व्याख्यान अायाेजित करण्यात अाले अाहे.

Lecture of Israel's ambassador in Pune University | पुणे विद्यापीठात इस्राईलच्या राजदूताचे व्याख्यान

पुणे विद्यापीठात इस्राईलच्या राजदूताचे व्याख्यान

Next

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग अाणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर अाॅफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅण्ड डिफेन्स अनॅलिसिस विभागामार्फत इंडिया अॅण्ड इस्राएल, अ मल्टीफॅसेटेड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या विषयावर भारतातील इस्राईलचे महामहिम राजदूत डॅनियल कार्मन यांचे व्याख्यान अायाेजित करण्यात अाले अाहे. कार्मन यांचे हे व्याख्यान 4 जुलै राेजी सायंकाळी 4 वाजता संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये हाेणार अाहे. 

    संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डाॅ. विजय खरे यांनी या संदर्भातील माहिती दिली. या कार्यक्रमासाठी मुंबईतील इस्राईलच्या दुतावासाचे महामहिम याकाेव्ह फिंकेलस्टीन हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार अाहेत. याचबराेबर यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डाॅ. एन एस उमराणी व मुंबईतील इस्राईलच्या दूतावासामधील राजकीय अधिकारी व विशेष प्रकल्प अधिकारी अनय जाेगळेकर हे देखील कार्यक्रमास उपस्थित राहणार अाहेत. 
 

Web Title: Lecture of Israel's ambassador in Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.