सिंबायोसिसतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:12 AM2021-05-20T04:12:06+5:302021-05-20T04:12:06+5:30

गैरसमज आणि चुकीच्या माहितीच्या आधारे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठी आणि ...

Lecture series on the background of corona by Symbiosis | सिंबायोसिसतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानमाला

सिंबायोसिसतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याख्यानमाला

Next

गैरसमज आणि चुकीच्या माहितीच्या आधारे रुग्ण व त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ही भीती दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचवण्यासाठी सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालयातर्फे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम इंग्रजी आणि मराठी अशा द्विभाषिक स्वरूपात सादर करण्यात येईल.

२० मे रोजी 'कोरोना : गैरसमज आणि वस्तुस्थिती', २१ मे रोजी 'कोरोना काळात गर्भधारणेशी सबंधित समस्या', 'कोरोना काळात लहान मुलांचे आरोग्य', 'मधुमेह आणि उच्च रक्तदाब' या विषयांवर चर्चासत्र होईल. २२ मे रोजी 'डोळ्यांची काळजी', 'होमिओपॅथीचे महत्व', 'आयुर्वेदाचे महत्व', 'कोरोना काळात घरात घ्यायची काळजी' या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. २३ मे रोजी 'पोस्ट कोविड काळजी' या विषयावर चर्चा होईल. अधिकाधिक नागरिकांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजीव येरवडेकर यांनी केले आहे.

Web Title: Lecture series on the background of corona by Symbiosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.