पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 12:49 PM2023-06-14T12:49:39+5:302023-06-14T12:49:55+5:30

वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीपात्रात खोल घेऊन जात त्याला मध्येच सोडून दुसऱ्या काठावर निघून गेले

Left in the middle of the Indrayani despite not being able to swim Drowning death of 11-year-old boy, crime against father | पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा

पोहता येत नसतानाही इंद्रायणीच्या मध्यभागी सोडले; ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, वडिलांवर गुन्हा

googlenewsNext

आळंदी : इंद्रायणी नदीत बुडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना ८ जून रोजी दुपारी आळंदीतील माउली मंदिर येथील इंद्रायणी घाटावर घडली. याप्रकरणी मुलाच्या आईने आळंदी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.१२) फिर्याद दिली असून मयत मुलाचे वडील विनायक धोंडीराम इप्पर (वय ३१ रा. भुगाव, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी वडील यांना माहिती होते की त्यांच्या मुलाला पोहता येत नाही. तरीसुद्धा वडिलांनी मुलाला इंद्रायणी नदीपात्रात खोल घेऊन जात त्याला मध्येच सोडून वडील दुसऱ्या काठावर निघून गेले. यात मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. यावरून वडिलांवरच मुलाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

Read in English

Web Title: Left in the middle of the Indrayani despite not being able to swim Drowning death of 11-year-old boy, crime against father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.