खडकवासला धरणातून पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:34 PM2018-07-23T15:34:44+5:302018-07-23T15:35:28+5:30
धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे.
पुणे: खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून धरणातून २५४० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून ७००० क्युसेक पाणी सोडण्यात आल्यामुळे मुठा नदी पुन्हा दुथडी भरून वाहत आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा सोमवारी सकाळी २४.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला. पानशेत येथे ३३, खडकवासला ८, वरसगाव ३४ आणि टेमघर येथे ३६ मिलिमीटर पाऊस झाला.
खडकवासला साखळीतील पानशेत धरण खडकवासला धरणापाठोपाठ सोमवारी सकाळी १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणातून २५४० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. खडकवासला धरण १०० टक्के भरले असल्यामुळे आणि पाउस चालू असल्यामुळे प्रवाह नियंत्रित करण्यासाठी खडकवासला धरणातील विसर्ग वाढवून ७००० क्युसेक करण्यात आला आहे. खडकवासला धरणातील पाणीसाठा आज सकाळपर्यंत २४.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे ८२.८७ टक्के झाला आहे. पानशेत येथे ३३, खडकवासला ८, वरसगाव ३४ आणि टेमघर येथे ३६ मिलिमीटर पाऊस झाला. वरसगाव धरणात ९.११ टीएमसी (७१.०५ टक्के) आणि टेमघर धरणात २.६० टीएमसी (७०.०९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.