की लिगल ब्लास्टर्स चॅम्पियन
By admin | Published: May 30, 2017 03:09 AM2017-05-30T03:09:19+5:302017-05-30T03:09:19+5:30
महेश प्रोफेशनल फोरमच्या (एमपीएफ) वतीने आयोजित एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीगमध्ये वेग्युलाईन वॉरियर्सवर ५ गडी राखून
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महेश प्रोफेशनल फोरमच्या (एमपीएफ) वतीने आयोजित एमपीएफ बॉक्स क्रिकेट लीगमध्ये वेग्युलाईन वॉरियर्सवर ५ गडी राखून मात करीत की लिगल ब्लास्टर्सने सोमवारी विजेतेपदाला गवसणी घातली.
‘लोकमत’ माध्यम प्रयोजक असलेली ही स्पर्धा गंगाधाम परिसरातील राजयोग लॉन्समध्ये झाली. अंतिम फेरीत प्रथम वेग्युलाईन वॉरियर्सने ८ षटकांत ९ बाद ७९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, ७.५ षटकांत ५ बाद ८० धावा फटकावत की लिगल ब्लास्टर्सने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यात किशोर धूतने १५ चेंडूंत ३५ धावा करीत मोलाचा वाटा उचलला.
महिलांच्या अंतिम सामन्यात इस्टर्न युनाइटेड संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दंगल गर्ल्स संघावर मात करून महिलांचे विजेतेपद पटकावले.या स्पर्धेला खेळाडूंचा तसेच क्रीडा रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. खेळाडू व प्रेक्षकांनी फुलून गेलेले मैदान, चौकार-षटकारांची आतषबाजी, डीजेचा ठेका अशा उत्साहपूर्ण वातावरणात स्पर्धा पार पडली. उपांत्य फेरीच्या लढतींना अभिनेत्री राजेश्वरी खरात उपस्थित होती. स्पर्धेचे पारितोषिक वितरण उद्योजक राजेश कासट यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी निकेत मंत्री, जय जाजू, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत लखोटिया, एमपीएफचे अध्यक्ष विमल करनाणी, संचालक पवन मंत्री, किरण झंवर, संदीप नवाल, अमित राठी, सचिन राठी, चेतन धूत, पुनीत बाहेती, राहुल डागा, तुषार लोहे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जाजू यांनी केले. पंच म्हणून दीपक मुंदडा, गोपाळ जाजू यांनी काम पहिले.
संक्षिप्त धावफलक : अंतिम फेरी
वेग्युलाईन वॉरियर्स : ८ षटकांत ९ बाद ७९ (संदीप काबरा २२, कौशल राठी १६, निखिल गांधी ३/११, गिरीराज मोहता २/१२) पराभूत वि. की लिगल वॉरियर्स : ७.५ षटकांत ५ बाद ८० (किशोर धूत ३५, रोहित मोहता २५, कौशल राठी २/१६, सागर कारवा १/१३).
वैयक्तिक पारितोषिके : सामनावीर (अंतिम फेरी) : रोहित मोहता. मालिकावीर : गिरीराज मोहता. सर्वोत्तम फलंदाज : प्रतीक मणियार. सर्वोत्तम गोलंदाज : पवन रंदाद. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक : मनोज चांडक .