खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांत ९ ऑगस्टपासून रानभाज्या महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:15 AM2021-08-12T04:15:56+5:302021-08-12T04:15:56+5:30
पुणे : रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करून ...
पुणे : रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व व माहिती जास्तीत जास्त ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना होण्यासाठी व विक्री व्यवस्था करून त्याचे विक्रीतून शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांत ‘रानभाज्या महोत्सव’ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले.
रानभाज्या महोत्सवाच्या कार्यक्रमात रानभाज्यांचे प्रदर्शन, विक्री, आहारातील महत्त्व, लागवड पद्धती व संवर्धन या अनुषंगाने उत्पादक शेतकरी व ग्राहकांना माहिती होणेसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गेल्या एक-दोन वर्षांपासून या रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून, शहरी भागातील लोकांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
****
फोटो -