विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:46 IST2024-12-09T14:44:44+5:302024-12-09T14:46:20+5:30
सकाळी ६ वाजता टिळेकर यांचे मामा वॉकिंग करत असताना चारचाकीतून आलेल्या ४,५ जणांनी त्यांना जबरदस्ती गाडीत घालून अपहरण केले

विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचे मॉर्निंग वॉक करताना अपहरण
हडपसर: विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामांचे अपहरण करण्यात आले आहे. ही घटना शेवाळवाडी येथे फुरसुंगी फाटा येथे सकाळी सहाच्या दरम्यान घडली. सतीश सातबा वाघ (वय ५८ वर्षे) रा. फुरसुंगी फाटा, आकाश लॉन शेजारी, ब्ल्यूबेरी हॉटेल शेजारी, मांजरी फॉर्म असे त्यांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास सतीश सातबा वाघ हे राहत्या घरासमोरून फुरसुंगी च्या दिशेने वॉकिंग करत होते. त्यावेळी क्रीम कलरच्या शेवरलेट एन्जॉय गाडीतून आलेल्या चार-पाच इसमांनी वाघ यांना जबरदस्ती गाडीत घातले. गाडी फुरसुंगीच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शी निलेश बाळासाहेब सोडनर (वय ४७ वर्षे) यांनी सांगितले आहे. ही घटना स्वतः त्यांनी बघितली आहे. घटनास्थळावर तपास अधिकारी व पथक तपास करीत आहेत. अशी माहिती हडपसर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.