आमदार, खासदारांना आश्वासनांचा विसर

By Admin | Published: July 7, 2015 04:07 AM2015-07-07T04:07:14+5:302015-07-07T04:07:14+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली.

Legislators, MPs forget the assurances | आमदार, खासदारांना आश्वासनांचा विसर

आमदार, खासदारांना आश्वासनांचा विसर

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली आहे. ‘शहराचे नेतृत्व करणाऱ्या तीन खासदार व तीन आमदारांनी शहरातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. शहरातील एकाही बांधकामाची वीट पाडू देणार नाही, असे ते निवडणुकीपूर्वी म्हणत होते. मात्र, आता त्यांना दिलेल्या शब्दांचा विसर पडला आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. ९) दुपारी एकला जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत साठे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकाम प्रश्नावर आता काँग्रेस हल्लाबोल करणार असून, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज पूर्ण माफ व्हावे व शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करावी या मागणीसाठी आंदोलन होणार आहे. त्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कदम, पुणे शहराध्यक्ष अ‍ॅड. अभय छाजेड सहभागी होणार आहेत. परिषदेस महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, माजी महापौर कविचंद भाट, सेवा दलाचे संग्राम तावडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, शिक्षण मंडळ उपसभापती श्याम अगरवाल, विष्णू नेवाळे, गणेश लंगोटे, संदेश नवले, नरेंद्र बनसोडे, मयूर जैस्वाल उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Legislators, MPs forget the assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.