पांढरी वस्ती येथील शेतात वीज कोसळल्याने लिंबाचे झाड जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:09 AM2021-04-16T04:09:35+5:302021-04-16T04:09:35+5:30
तळेगाव ढमढेरे हद्दीतील पांढरी वस्ती येथे रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला यावेळी शेतात उभ्या असणाऱ्या लिंबाच्या ...
तळेगाव ढमढेरे हद्दीतील पांढरी वस्ती येथे रात्री विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला यावेळी शेतात उभ्या असणाऱ्या लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने लिंबाच्या झाडाचे अक्षरशः तुकडे झाले व बाजूच्या शेतात विखुरले गेले. लिंबाचे झाड पूर्णतः जळून खाक झाले. या लिंबाच्या झाडाची उंची साधारण पंचवीस ते तीस फूट होती. बाजूलाच ज्वारीचे पीक असल्याने या ज्वारीच्या पिकालाही विजेच्या झळा बसल्याने ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाले. पांढरी वस्ती येथे शेतकरी वर्ग शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने गाय व म्हशीची संख्या जास्त आहे. जनावरांच्या गोठ्यावर वीज कोसळली असती तर जीवित हानी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. सुदैवाने ही वीज शेतातील झाडावर कोसळल्याने फक्त शेतामध्ये उभे असणारे लिंबाचे झाड जळून खाक झाल्याने फक्त बुंध्याला वाळलेले लाकूड शिल्लक राहिले आहे.
--
फोटो क्रमांक : १५ तळेगाव ढमढेरे झाड
फोटो ओळी : तळेगाव ढमढेरे पांढरी वस्ती येथे वीज कोसळल्याने जळालेले लिंबाचे झाड