दौंड तालुक्यातही आला बिबट्या; ठसे आढळले, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:46 AM2018-12-25T00:46:23+5:302018-12-25T00:46:33+5:30
जुन्नर आणि आंबेगावमध्ये बिबट्यांचे सर्रास दर्शन होत असताना आता बिबट्यांनी थेट दौंड तालुक्यातही आपला वावर वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाटस : जुन्नर आणि आंबेगावमध्ये बिबट्यांचे सर्रास दर्शन होत असताना आता बिबट्यांनी थेट दौंड तालुक्यातही आपला वावर वाढविल्याचे स्पष्ट झाले आहे. कानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी राजेंद्र गवळी हे शेतकाम उरकून जे.सी.बी मशीन घेऊन घरी येत असताना रात्री ८ च्या सुमारास त्यांना अचानक बिबट्या रस्त्यावर आल्याचे दिसून आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे कानगाव व पंचक्रोशीत आता बिबट्याची दहशत पसरली आहे.
यापूर्वीही बिबट्याचे दर्शन या भागात झाले होते. इतकेच नव्हे तर चार वेळा बिबट्याने येथील पाळीव जनावरांची शिकारही केली होती.
मात्र ती क्वचीतच झालेली होती. पण हल्ली आंबेगाव आणि शिरुरमद्ये बिबट्यांची संख्या आणि त्यांचे हल्लेही वाढल्याच्या बातम्या वारंवार येत असताना कानगावमद्येही बिबट्या नजरेस आल्याने येथेही बिबट्यांची संख्या वाढल्याची भिती व्यक्त केली जात आहे. याबाबत पुणे जिल्हा राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष माऊली शेळके यांनी तात्काळ वनविभाच्या अधिकाºयांना कानगावमध्ये बिबट्या असल्याचे दुरध्वनीद्वारे कळवले. दरम्यान परिस्थितीची पाहणीसाठी करण्यसाठी वनविभाग अधिकारी देखील उपस्थित झाले.
मात्र बिबट्यांच्या पायांच्या ठशांवरून तो गेलेली दिशा कळाली मात्र त्याचा नेमका ठाव ठिकाणा सापडला नाही. यावेळी माऊली शेळके, भीमा पाटसचे संचालक राजेंद्र गवळी, धनंजय कोºहाळे, शिवाजी निगडे, वनविभाग मंडल अधिकारी सय्यद आणि कर्मचारी उपस्थित होत.
राजेंद्र गवळी यांना रात्री रस्त्यावरच बिबट्याचे दर्शन घडले. त्यांनी जेसीबी मशीन थांबवून जेसीबीच्या लाईटमध्ये मोबाईलमध्येच चित्रीकरण केले आहे. त्याचा व्हिडीओ गावात व्हायरल होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात पाणी सोडण्यासाठी
शेतकरी घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत. वीजपुरवठा दिवसा खंडित
होत असल्याने दिवसाही शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे बिबट्याच्या भीतीचा थेट परिणाम शेतीच्या
पाण्यावर होतो आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गावा-गावामध्ये बिबट्याचा वावर सर्रास झाला आहे. परिणामी शेतकºयांचे नुकसान होऊन भीती निर्माण झाली आहे. परंतु दुर्दैवाने सरकार यावर गंभीर नाही. त्यामुळे आता तरी सरकारने वेळेत याची दक्षता घेऊन तत्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- मा. माऊली शेळके
अध्यक्ष, राष्ट्रवादी किसान
सेल, पुणे जिल्हा