Leopard Attack: जुन्नर तालुक्यात मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला; मुलगा धावत आला अन् आईला वाचवले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 04:34 PM2024-10-07T16:34:52+5:302024-10-07T16:36:15+5:30

महिला झोपली असताना बिबट्याने हल्ला करून उजव्या हाताला चावा घेत ओढण्याचा प्रयत्न केला

Leopard attack on shepherd woman in Junnar taluka; The son came running and saved the mother | Leopard Attack: जुन्नर तालुक्यात मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला; मुलगा धावत आला अन् आईला वाचवले

Leopard Attack: जुन्नर तालुक्यात मेंढपाळ महिलेवर बिबट्याचा हल्ला; मुलगा धावत आला अन् आईला वाचवले

ओतूर :जुन्नर तालुक्यातील ओतूर हद्दीतील हांडेबन वाघदरातील कुडाचे माळ परीसरात सोमवारी पहाटे ४ वाजे च्या दरम्यान बिबट्याने मेंढपाळाच्या वाड्यावरील पालात घुसून महिलेवर हल्ला करून जखमी केले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

अधिक माहिती अशी की, मेंढपाळांचा ओतूर मधील हांडेबन वाघदरा येथील कुडाचे माळ येथे आबांदास डुंबरे यांच्या शेतात रात्रीचा मुक्कामी मेंढ्याचा वाडा होता. मेंढ्याच्या वाड्यात पाल ठोकूण मेंढपाळ कुटूंब झोपले होते. सोमवार दि. ७ ऑक्टोंबर रोजी पहाटे चार वाजेदरम्यान बिबट्याने पालात झोपलेल्या मिराबाई बरू बरकडे (वय ४४) यांच्यावर हल्ला करून उजव्या हाताला चावा घेऊन ओढण्याचा प्रयत्न केला. मोठा आवाज आयकुन मीरा बोरकडे यांचा मुलगा धावत पाला जवळ आला व बिबट्याला आरडाओरडा करून हुसकून लावले. यावेळी सुदैवाने मोठी दुर्घटनाच टळली असल्याची स्थानिकांनी सांगितले,  हल्यानंतर तत्परतेने जखमी महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र नारायणगाव येथे नेण्यात आले. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावला आहे रिस्क्यू टीम देखील दाखल झाली असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Web Title: Leopard attack on shepherd woman in Junnar taluka; The son came running and saved the mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.