महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 03:00 AM2018-02-03T03:00:03+5:302018-02-03T03:00:26+5:30

हिवरे खुर्द, ओझर येथील ऊसतोडणी करणाºया महिलेवर हल्ला करणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या ६ ते ७ वर्षे वयाचा मादी बिबट असून घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.

 Leopard attack woman | महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  

महिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद  

Next

आपटाळे : हिवरे खुर्द, ओझर येथील ऊसतोडणी करणाºया महिलेवर हल्ला करणाºया बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचा-यांना यश आले आहे. जेरबंद झालेला बिबट्या ६ ते ७ वर्षे वयाचा मादी बिबट असून घटनास्थळापासून ३०० मीटर अंतरावर जेरबंद झाला असल्याची माहिती वनपाल मनीषा काळे यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून या बिबट्याचे वास्तव्य परिसरात होते. आठ दिवसांपूर्वी पहाटे ऊस तोडणी चालू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केला होता. त्यात महिलेचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेमुळे हिवरे खुर्द परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्तारोखोदेखील केला होता. त्यामुळे वनकर्मचारी व अधिकारी यांच्यावर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
वनविभागाने घटनेनंतर हिरवे खुर्द परिसरात दहा पिंजरे लावले होते. आठ दिवस उलटून देखील बिबट्या पिंजºयात अडकत नव्हता. त्यामुळे नागरिकांचा संताप अधिक तीव्र होत होता. परंतु आज शुक्रवार पहाटे भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला.
त्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जयवंत पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मनीषा काळे, वनरक्षक प्रशांत जाधव, वनमजूर काशिनाथ नवगिरे, खंडू भुजबळ, सुधीर भुजबळ, वनरक्षक कांचन ढोमसे आदींनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Web Title:  Leopard attack woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.