ओतुरला ५२ वर्षीय महिलेवर बिबट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 18:36 IST2025-02-22T18:35:43+5:302025-02-22T18:36:33+5:30
ओतूर येथील तांबेमळा येथे बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.

ओतुरला ५२ वर्षीय महिलेवर बिबट हल्ला
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर तांबेमळा नं २ येथे बिबट्याने मोटरसायकलवरून घरी जात असताना महिलेवर हल्ला करून जखमी केले असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. अधिक माहिती अशी की शुक्रवारी (दि. २१) फेब्रुवारी रोजी ज्योती राजेश ढमाले (वय ५२ रा. तांबेमळा नं २, ओतूर ता. जुन्नर) या रात्री मोटारसायकल वरून जात असताना ९.४५ वाजता त्यांच्यावर ओतूर येथील तांबेमळा येथे बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले.
यावेळी त्यांना तात्काळ ओतूर प्राथमिक केंद्रात दाखल करून प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार करण्यात आले. परंतु त्या हल्ला झाल्यानंतर मोटरसायकलवरून खाली रस्त्यावर पडल्यामुळे त्यांना डोक्याला मार लागला त्यामुळे सिटीस्कॅन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे नेण्यात आले.
सिटीस्कॅन केल्यानंतर पुढील उपचारासाठी वायसीएम पुणे या ठिकाणी घेऊन जाण्यास सांगितले नंतर तात्काळ त्यांना वायसीएम पुणे या ठिकाणी हलविण्यात आले व तेथे त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात आले. ओतूर तांबेमळा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तात्काळ वनविभागाचे पथक दाखल होऊन वनपाल एस. एम. बुट्टे, वनरक्षक व्ही. ए. बेले, किशन केदार, फुलचंद खंडागळे, साहेबराव पारधी व रेस्क्यू टीम यांनी सदर ठिकाणी पिंजरा लावून बिबट वन्य प्राण्याबद्दल माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करीत आहेत.