बिबट्यांचे हल्ले गंभीर बाब
By admin | Published: September 14, 2016 01:01 AM2016-09-14T01:01:02+5:302016-09-14T01:01:02+5:30
सद्यस्थितीत संपूर्ण राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, त्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, समन्वय साधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार
पाटेठाण : सद्यस्थितीत संपूर्ण राहूबेट परिसरात बिबट्याचे जनावरांवरील हल्ले वाढतच असून, त्याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा, समन्वय साधून त्यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
देवकरवाडी (ता. दौंड) येथील मागील आॅगस्ट महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरांचा मृत्यू झाल्यामुळे राहूबेट परिसरातील ३ शेतकऱ्यांना वन विभागाकडून नुकसानभरपाई आर्थिक मदत
म्हणून धनादेशाचे वाटप करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते.
आॅगस्ट महिन्यात पिलाणवाडी येथील शेतकरी दत्तात्रय वसंत कुल, देवकरवाडीचे ज्ञानेश्वर नामदेव देवकर, तसेच एकनाथ पंढरीनाथ नवले यांची प्रत्येकी एक शेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत झाली होती.
येथील घटनेचा पंचनामा वन विभागाचे अधिकारी, स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात आला होता. वन विभागाकडून अठरापैकी बारा नुकसानभरपाई अर्ज मंजुरी प्राप्त झाल्यानंतर संबंधित तीन शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपये रकमेचे धनादेश कुल यांच्या हस्ते देण्यात आले.
यवत विभागाचे वन परिमंडल अधिकारी सरवर खान, वनरक्षक अरुण देशमुख, कर्मचारी सुरेश पवार यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.