बिबट्याचा महिलेवर हल्ला, शिरूर तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:13 AM2021-08-25T04:13:50+5:302021-08-25T04:13:50+5:30

भावाला राखी बांधून राणी आपल्या मुलाबरोबर मोटारसायकलवरून सासरी घरी जाण्यासाठी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास निघाल्या होत्या. या वेळी बिबट्याने ...

Leopard attacks woman in Dhumakul in eastern part of Shirur taluka | बिबट्याचा महिलेवर हल्ला, शिरूर तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ

बिबट्याचा महिलेवर हल्ला, शिरूर तालुक्यातील पूर्व भागात धुमाकूळ

Next

भावाला राखी बांधून राणी आपल्या मुलाबरोबर मोटारसायकलवरून सासरी घरी जाण्यासाठी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास निघाल्या होत्या. या वेळी बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घालून राणी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या हाताला बिबट्याचे दात, तर कमरेला पंजाची नखे लागून त्या जखमी झाल्या आहेत. दुचाकीचा वेग कमी होता. दोन्ही बाजूला ऊस होता. मात्र, काही कळायच्या आत बिबट्याने दुचाकीच्या दिशेने झडप घातली. या वेळी आई रस्त्यावर पडलेली असताना आईच्या साडीला बिबट्या ओढत होता. मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

सरपंच सचिन शेलार यांनी पिंजरा बसवण्याच्या मागणीनुसार तातडीने दखल घेत शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. क्षीरसागर, वनरक्षक एस. जे. पावणे, एस. एम. जराड, वनसेवक एन. बी. गांधले, एस. बी. शितोळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

240821\img-20210824-wa0140.jpg

वडगाव रासाई परिसरात बिबट्याचा महिलेवर हल्ला

Web Title: Leopard attacks woman in Dhumakul in eastern part of Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.