बिबट्याचे बछडे लहान म्हणून पाहण्यासाठी गर्दी करू नये - उसात मोठ्या प्रमाणावर प्रजनन; गावकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:17+5:302021-04-19T04:09:17+5:30

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी बछडे सापडत आहेत. या बछड्यांना पुन्हा ...

Leopard calves should not be crowded to be seen as small - large breeding in sugarcane; The cooperation of the villagers is important | बिबट्याचे बछडे लहान म्हणून पाहण्यासाठी गर्दी करू नये - उसात मोठ्या प्रमाणावर प्रजनन; गावकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे

बिबट्याचे बछडे लहान म्हणून पाहण्यासाठी गर्दी करू नये - उसात मोठ्या प्रमाणावर प्रजनन; गावकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे

Next

पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे प्रजनन होत असल्याने त्या ठिकाणी बछडे सापडत आहेत. या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईकडे सोपविण्याचे मोठे कार्य वाइल्डलाइफ एसओएस संस्थेकडून केले जाते. तेथील पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल बनगर यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.

प्रश्न - बिबट्यांचे बछडे उसाच्या शेतात का सापडतात?

- जुन्नर तालुक्यात पाच धरणं आहेत. त्यामुळे येथे उसाची शेती प्रामुख्याने केली जाते. ही शेतीच बिबट्यांसाठी नवीन अधिवास ठरत आहे. तो अधिवास त्यांना सोयीस्कर आणि सुरक्षित आहे. त्यामुळे त्यांचे उसाच्या शेतीत प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऊसतोडीमध्ये प्रामुख्याने बछडे सापडतात. कारण ऊस तोडायचा नसतो, तेव्हा आत कोणी जात नाही. त्यामुळे त्यांचे बछडे सुरक्षित असतात.

प्रश्न - बछडे सापडल्यानंतर त्यांचे काय करता ?

- बछडे सापडल्यावर अगोदर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. परंतु, त्यांना आम्ही जास्त हाताळत नाही. माणसांपासून दूरच ठेवतो. त्यांना इजा झाली नाही ते पाहतो. शक्यतो ते हेल्दीच असतात. जर काही इजा झाली तर त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले जातात व त्यांची काळजी घेतो. माणिकडोह येथे वाइल्ड लाइफ एसओएस संस्था २००७ पासून बिबट्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहे. या संस्थेकडे दीर्घ अनुभव असणारी टीम आहे.

प्रश्न- बछडे पाहायला लोकं गर्दी करतात त्याचा त्रास होतो का ?

- होय, बछडे लहान आहेत, ते हल्ला करत नाहीत. त्याच्यापासून धोका नाही. म्हणून लोकं त्यांना पाहायला गर्दी करतात. त्यामुळे बिबट्या जवळपास कुठे असेल, तर लोकांच्या जीवाला धोका असतो. कारण बिबट्या जवळच असण्याच्या घटना बहुतेक वेळा घडलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळावे. गर्दी असेल तर आई लवकर येत नाही, तिथे येण्यास ती वेळ घेते. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये, बछडे दिसले की वन विभागला त्वरित कळवावे.

प्रश्न - बछड्यांना सोडण्याची जागा कशी निवडता?

- आम्हाला नागरिक सांगतात की, या ठिकाणी बछडे सापडले होते. पण आम्ही त्या परिसराची माहिती घेतो. तिथे कुठे दुसरे उसाचे शेत आहे का? जवळपास अधिवास आहे का ? बिबट्या कुठून आला असेल, याचा शोध घेऊनच मग ती जागा निश्चित केली जाते.

प्रश्न - बछड्यांना पुन्हा आईकडे कसे सोपवता ? बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सोडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. ज्या दिवशी बछडे सापडले, त्याच रात्री तिथेच प्रयत्न करावा लागतो. त्या ठिकाणी आम्ही इन्फ्रारेड कॅमेरा ट्रॅप लावतो. जेणेकरून आम्हाला खात्री होते की आई पिल्लांना घेऊन गेली.

Web Title: Leopard calves should not be crowded to be seen as small - large breeding in sugarcane; The cooperation of the villagers is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.