बिबट्या आला रे... नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:22+5:302021-03-31T04:11:22+5:30

जखमीला लवकरात लवकर मदत मिळेल – मनोहर म्हसेकर (वनपरीक्षेत्र अधिकारी) वढू बुद्रुक येथे बिबट्याचा हल्ला झालेल्या इसमाला शासकीय नियमानुसार ...

The leopard came ... An atmosphere of fear among the citizens and farmers | बिबट्या आला रे... नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

बिबट्या आला रे... नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Next

जखमीला लवकरात लवकर मदत मिळेल – मनोहर म्हसेकर (वनपरीक्षेत्र अधिकारी)

वढू बुद्रुक येथे बिबट्याचा हल्ला झालेल्या इसमाला शासकीय नियमानुसार मिळणारी सव्वा लक्ष रुपये मदत मिळवून देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून लवकरच सदर मदत लवकरात लवकर जखमी व्यक्तीस मिळवून दिली जाईल, असे शिरूर विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

वनविभागाकडून मिळणारे अर्थसाहाय्य व मदत .

व्यक्ती मृत झाल्यास – १५ लक्ष रुपये.

व्यक्ती अपंग झाल्यास – पाच लक्ष रुपये,

व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास – १ लक्ष २५ हजार रुपये,

व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास – उपचारासाठी येणारा खर्च २० हजार रुपयांपर्यंत,

गाय, म्हैस, बैल मृत झाल्यास – बाजारभाव किमतीच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये या प्रमाणे वनविभागाकडून मदत मिळते.

म्हणून बिबट्या नागरिकांवर हल्ले करतो.

.

शेतातील उसामध्ये मादी बिबट्या तसेच बिबट्याची पिल्ले असतील त्यावेळी मादीचे संरक्षण व आपल्या सर्व पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी बिबट्या तेथे आलेल्या नागरिकांवर हल्ले करू शकतो.

म्हणून बिबट्या मनुष्य वस्तीकडे

पुणे जिल्ह्यात भीमाशंकर अभयारण्य तसेच माणिकडोह निवारा केंद्र असून येथील जंगलांची मोठ्या प्रमाणात तोड झालेली असल्यामुळे बिबट्याला अन्नाच्या शोधात भटकावे लागत असल्याने बिबट्याचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले आहेत.

वनविभागाने केलेली उपाययोजना

बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना संरक्षण मिळावे यासाठी वनविभागाच्या वतीने गावोगावी जाऊन याबाबत चित्रफीत दाखवून सावधानता बाळगण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात येत असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव तयार करणे आणि बिबट्या असलेल्या भागात पिंजरे लावणे यांसह आदी उपाययोजना वनविभागाच्या वतीने केल्या जात आहेत.

पिंजऱ्यात ठेवावी लागते शेळी-मेंढी

वनविभागाच्या वतीने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावत असताना पिंजऱ्यात शेळी अथवा मेंढी ठेवावी लागत असते, लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्याला दोन कप्पे असतात त्यामुळे त्यामध्ये ठेवलेली शेळी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानंतर लगेच बाजूला केली जाते त्यामुळे शेळी सुरक्षित राहत असते मात्र अनेक शेतकरी पिंजऱ्यामध्ये शेळी देण्यासाठी कानाडोळा करत असतात.

Web Title: The leopard came ... An atmosphere of fear among the citizens and farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.