कांदळी येथे बिबट्याची मादी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:31 AM2019-03-18T02:31:06+5:302019-03-18T02:31:20+5:30

कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली.

leopard catch in kandali | कांदळी येथे बिबट्याची मादी जेरबंद

कांदळी येथे बिबट्याची मादी जेरबंद

Next

खोडद - कांदळी येथे लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याची मादी जेरबंद झाली. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी पशुधनाची व आपली स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनदेखील येळे यांनी केले आहे.
कांदळी येथील शेतकरी किरण सावळेराम घाडगे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात ही ३ वर्षे वयाची बिबट्याची मादी जेरबंद झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, वनपाल एस. आर. खट्टे, नियतक्षेत्र वनअधिकारी आकाश तंगडवार, नाथा भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कांदळी येथे पिंजरा लावण्यात आला होता. मागील काही दिवसांपासून कांदळी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. बिबट्यांकडून शेळ्या, मेंढ्या, कालवडी आणि कोंबड्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. कांदळी परिसरात बिबट्या जेरबंद करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी वडामाथा येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनखात्याला यश आले होते. कांदळी, वैशाखेड परिसरात आणखी बिबटे असावेत, अशी शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. येथील परिसरात पिंजरा लावून राहिलेल्या बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी राहुल घाडगे, गोरक्षनाथ घाडगे, शिवाजी घाडगे, सुजित गुंजाळ, श्रीकांत घाडगे, प्रफुल रेपाळे, विशाल रेपाळे, सुनील गुंजाळ, संजय घाडगे, मयूर घाडगे, जालिंदर घाडगे यांनी केली आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात पाणी भरावे लागते. या परिसरात बिबट्याचा
वावर वाढल्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडायलादेखील धजावत नाही. यामुळे शेतीवर परिणाम झाला आहे.

आपल्या तालुक्यात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. बिबट्यांसाठी मुख्य लपन म्हणजे ऊस आहे. बिबट्यांना व त्यांच्या पिलांना उसात सुरक्षित निवारा, गारवा, पिण्यासाठी पाणी, ससे, उंदीर यांसारखे आदी भक्ष्य हे अगदी सहज उसातच उपलब्ध होते. यामुळे उसात बिबट्यांचे वास्तव्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जुन्नर तालुक्यात ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊसतोडणीमुळे सध्या बिबट्यांची लपन कमी होत आहे. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात बिबटे आता मानवी वस्त्यांमध्ये येऊ लागले आहेत. नागरिकांनी आपले पशुधन आणि स्वत:ची काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या, कालवडी व आदी जनावरे बंदिस्त गोठ्यांमध्ये सुरक्षित ठेवावीत. तसेच शेतकºयांनी रात्रीच्या वेळी शेतात काम करताना हातात काठी आणि सोबतीला एक-दोन जण घेऊन जावे. बिबट्या दिसल्यास घाबरून जाऊ नये किंवा त्याच्यासमोर खाली वाकण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी बिबट्या हल्ला करण्याचा धोका अधिक असतो.
- बी. सी. येळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला


निरगुडसर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागापूर (रिठेमळा) येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मनेश भगवंत रिठे यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने ठार केले.
तालुक्याच्या पूर्व भागात सततच्या होणाºया हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. रात्री दिसणारा बिबट्या आता दिवसाही दिसू लागल्याने शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही. त्याचा परिणाम शेतीकामावर झाला आहे. वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली असून मागील आठवड्यात पोंदेवाडी येथे बिबट्याने हल्ला करून एका युवकाला जखमी केले होते. तसेच नागापूर या ठिकाणी एका बिबट्याच्या बछड्याला पकडून पुन्हा त्याच्या आईच्या हवाली करण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी पोंदेवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला सुखरूप बाहेर काढण्यात वनविभगाला यश आले होते. दररोज पूर्व भागात कुठेना कुठे हल्ला झाल्याची घटना घडत आहेत.
त्यामुळे नागापूर, पोंदेवाडीमधील नागरिक बिबट्याच्या वावरामुळे दहशतीखाली आहेत. वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागापूरचे उपसरपंच सनील शिंदे व पोंदेवाडीचे सरपंच अनिल वाळुंज यांनी केली आहे. परिसरात उसाचे मोठे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्याचा कायम वावर असतो. या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे.
उसाचे क्षेत्र तसेच एका बाजूला असणारे जंगल, डोंगर यामुळे पाळीव प्राण्यांना या ठिकाणी वास्तव्याला पोषक वातावरण आहे. सध्या
नागापूर व पोंदेवाडीत दिसणाºया बिबट्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: leopard catch in kandali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.