विहिरीत पडून बिबट्याच्या मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:07 AM2021-04-29T04:07:04+5:302021-04-29T04:07:04+5:30
धनगरवाडी येथील शेतकरी रमेश दगडू शेळके हे सकाळी १० वा. विहिरीवर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यांना ...
धनगरवाडी येथील शेतकरी रमेश दगडू शेळके हे सकाळी १० वा. विहिरीवर पाण्याची मोटर चालू करण्यासाठी आले असता त्यांना कठडा नसलेल्या विहिरीमध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविली असता त्या ठिकाणी वन विभागाच्या वन परिमंडळ अधिकारी मनीषा काळे, वनरक्षक कल्याणी पोटवडे, श्रीपती नेहरकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी सरपंच महेश शेळके यांच्या मदतीने मृत बिबट्याला बाहेर काढून माणिकडोह निवारण केंद्र येथे नेले. दरम्यान, रमेश शेळके यांच्या शेताजवळ धनगराचा वाडा असल्याने बिबट्या सावज मिळण्याच्या अपेक्षेने त्या परिसरात आला असताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अडकून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.