फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:15 PM2020-02-17T20:15:22+5:302020-02-17T20:22:00+5:30

बिबट्याच्याजवळ जाण्यापेक्षा फटाके फोडावेत

leopard in fursungi ; fear in citizens | फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत 

फुरसुंगीत बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत 

googlenewsNext
ठळक मुद्देबिबट्याच्या हल्ल्यात दोन कुत्र्यांचा मृत्यूपिंजरा लावण्यासाठी वनविभागची असमर्थतता

फुरसुंगी : गेल्या आठवड्यात फुरसुंगी परिसरात बिबट्या नागरिकांना दिसला. त्यानंतर नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. काल रात्री पुन्हा येथील बेंदवाडी परिसरात बिबट्या दिसला. त्याचा फोटो येथील नागरिकांच्या मोबाईलमध्ये आज दिवसभर फिरु लागला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. बिबट्याने फुरसुंगी परिसरातील सायकर वस्तीवरील दोन कुत्र्यांवर हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज वनखात्याने व्यक्त केला आहे.
कोरेगांवमूळ येथे वनविभागाने सध्या पिंजरा लावला आहे. तेथून ते काढून दिले जात नाहीत. त्यामुळे सध्या तरी या परिसरात वनविभागाच्यावतीने पाहणी करुन नागरिकांना जागृत केले जात आहे. रात्री बेंदवाडी परिसरात जेथे बिबट्याने दर्शन दिले तेथे त्याच्या पावलाचे ठसे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले आहेत.
वनपरिक्षेत्र अधिकारी एम.जे. सणस यांच्या मागदर्शनाखाली लोणी काळभोरचे वनपाल वाय.यू. जाधव व वडकीचे वनरक्षक राहुल रासकर या परिसरात पाहणी करुन उपाययोजना करीत आहेत. आज सायकर वस्ती येथे दोन मृत कुत्री आढळली आहेत. त्याच्या मानेवर ज्या हल्ल्याच्या खुणा दिसत आहेत. त्यावरुन तरी तो हल्ला बिबट्याने केल्याचे पुढे येत आहे. सध्या कोरंगाव मूळ येथे पिंजरा लावलेले आहेत. तेथून काढून दिले जात नाहीत. नागरिकांना जर बिबट्या दिसला तर फटाके फोडावेत. असे वनविभागाच्यावतीने सांगण्यात येत आहे. शक्यता एकट्याने बाहेर पडून नये. बिबट्याच्याजवळ जाण्यापेक्षा फटाके फोडावेत. दोन दिवसांमध्ये बिबट्याच्या हालचाली आढळल्यास पिंजरा लावण्यात येईल असेही वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: leopard in fursungi ; fear in citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.