बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद

By admin | Published: February 26, 2016 04:26 AM2016-02-26T04:26:50+5:302016-02-26T04:26:50+5:30

रानमळा (ता. जुन्नर) येथील मदगुलेमळा शिवारातील तोतरबेट येथे वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी गुरुवारी (दि. २५) पहाटे जेरबंद झाली. अलीकडच्या काळात

Leopard girl marsh in pigeon | बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद

बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद

Next

बेल्हा : रानमळा (ता. जुन्नर) येथील मदगुलेमळा शिवारातील तोतरबेट येथे वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची मादी गुरुवारी (दि. २५) पहाटे जेरबंद झाली. अलीकडच्या काळात पिंजऱ्यात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या आहे. रानमळा येथे मदगुलेमळा शिवारातच दि.११ जानेवारी रोजी बिबट्याने कांद्याच्या शेतात काम करीत असलेल्या कल्पना गुंजाळ या ३२ वर्षीय महिलेवर हल्ला केला होता. त्यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगरुळ येथील आंबेविहिर परिसरातील कांद्याच्या शेतात काम करत असलेल्या कविता जाधव या ३२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते.

Web Title: Leopard girl marsh in pigeon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.