खेड तालुक्यातील दावडी -निमगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 01:56 PM2021-07-19T13:56:38+5:302021-07-19T13:57:30+5:30

दावडी -निमगाव परिसरात गेल्या वर्षापासुन बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरावर, शेळ्या मेंढयावर बिबट्या हल्ला करून फस्त करित होता.

A leopard that had been roaming in Khed taluka for several days has finally been arrested | खेड तालुक्यातील दावडी -निमगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

खेड तालुक्यातील दावडी -निमगाव परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Next
ठळक मुद्देबिबट्याची शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत

दावडी: खेड तालुक्यातील दावडी परिसरात या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करित आहे.

दावडी -निमगाव परिसरात गेल्या वर्षापासुन बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरावर, शेळ्या मेंढयावर बिबट्या हल्ला करून फस्त करित होता. वनविभागाकडे पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करित होते. बिबट्याचे हल्ले सुरुच होते.

पाच दिवसापुर्वी एक घोडी व दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. शेवटी वन खात्याने दोन दिवसापूर्वी दावडी व निमगाव या गावच्या शिवेवर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. खाद्य म्हणून त्यात मेंढी बांधली होती. सोमवारी सकाळी शेतकऱ्यांनी बिबट्या अडकल्याचे पाहून वनविभागाला फोन केला. वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यात तो अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या परिसरात शेतात जाणाऱ्या

शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली होती. काही शेतकऱ्यांची जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत होता. कुत्रे, शेळ्या आणि जनावरे बिबट्याने फस्त केली होती. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत होती. त्यामुळे रात्री कोणी शेतात जात नसे. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन माणिकडोह परिसरात सोडण्यात आले अशी माहिती वनरक्षक सुषमा चौधरी यांनी दिली. दोन वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या असल्याचे चौधरी यांनी सांगितले.  बिबट्याला जेरबंद केल्यामुळे दावडीचे सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहूल कदम ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, हिरामण खेसे यांच्यासह शेतकऱ्यांनी व आनंद व्यक्त केला. 

Web Title: A leopard that had been roaming in Khed taluka for several days has finally been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.