Video: कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 01:25 PM2024-07-08T13:25:31+5:302024-07-08T13:27:59+5:30

बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागल्याने दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे

leopard in Katraj Ghat area A climate of fear among pune citizens | Video: कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Video: कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धनकवडी : पुण्यातील प्रसिद्ध सासवड रोडवर असलेल्या दिवे घाटात दोन दिवसांपूर्वी बिबट्या रस्त्यावरुन जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडिओमध्ये बिबट्या रस्त्याच्या मधून जात असल्याचं दिसत आहे. हि घटना ताजी असतानाच भिलारेवाडी येथील गॅरेज व्यावसायिक सय्यद सैफ व सहकारी साजिद शेख चारचाकी मधून जात असताना रविवारी (दि. ७) रात्री आर्यन स्कूल जवळ असलेल्या क्रेशर परिसरात बिबट्या बसल्याचे निदर्शसनास आले. त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये बिबट्यांचा व्हिडिओ आणि फोटोही काढला. 

आम्ही दोघे चारचाकी मधून जात होतो. बिबट्या अगदी बिनधास्त बसला होता. आम्ही आल्याची चाहूल लागताच बिबट्या निघून गेल्याचे सैफ यांनी सांगितले. 

बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागले आहे. त्या मुळे दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. मागील काही काळापासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला असून कात्रज घाट परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान कात्रज घाटातील बिबट्याच्या दर्शनामुळे कात्रज घाटांस गुजर- निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी आदी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. काही दिवसां पूर्वी भिलारेवाडी आणि गुजर- निंबाळकर वाडीच्या हद्दीतही स्थानिक नागरिकांच्या नजरेस बिबट्या पडला होता. या संदर्भात वन अधिकारी संभाजी गायकवाड यांच्या शी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. मात्र कात्रज घाट आणि परिसर हे वनक्षेत्र आहे. या भागात याआधीही बिबट्या सदृश प्राणी दिसून आलेले आहेत. 

Web Title: leopard in Katraj Ghat area A climate of fear among pune citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.