काठापूरला बिबट्या जेरबंद
By Admin | Published: July 16, 2016 01:01 AM2016-07-16T01:01:46+5:302016-07-16T01:01:46+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बु. येथे अनेक जनावरांना फस्त करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात
औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर हजारो खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे औरंगाबादकर जाम कंटाळले आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले. या अंदाजपत्रकाला कडाडून विरोध दर्शविण्याचे काम मनपा पदाधिकाऱ्यांनी सुरू केले. कंत्राटदारांमार्फत पॅचवर्कचे काम करण्यापेक्षा मनपाने ३ कोटी रुपये खर्च करून स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, असा आग्रह सुरू आहे. आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनीही मनपाला स्वत:चा डांबर प्लँट उभारणे शक्य नसल्याचे जाहीर करून वादात आणखी तेल ओतले आहे.
सहा महिन्यांपूर्वी प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाने स्वत:चा डांबर प्लँट उभारावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मनपा अधिकारी प्रारंभापासूनच डांबर प्लँट उभारणे अशक्य असल्याचे सांगत आहेत. चार दिवसांपूर्वी महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी सांगितले की, पॅचवर्क करण्यासाठी सुमारे ३ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. निविदा काढून पाऊस थांबल्यावर ही कामे करण्यात येणार आहेत. महापौर त्र्यंबक तुपे आणि सभागृह नेते राजेंद्र जंजाळ यांनी कंत्राटदारांकडून पॅचवर्क नको म्हणून कडाडून विरोध केला. मनपाने स्वत:चा डांबर प्लँट सुरू करावा, अशी सूचना त्यांनी केली. शुक्रवारी पुन्हा महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापतींनी आयुक्तांना पत्र दिले. या पत्रात मनपाने स्वत:चा डांबर प्लँट त्वरित उभारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. प्लँटसाठी ३ कोटींची अर्थसंकल्पात तरतूदही आहे.
मनपाला परवडणार नाही....
सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आयुक्त बकोरिया यांनी सांगितले की, डांबर प्लँट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. संगणकीय पद्धतीचा प्लँट सांभाळण्यासाठी कर्मचारी, डांबर कुठे वापरले, साहित्य खरेदीच्या नोंदी ठेवणे हे सर्व काही करणे मनपाला परवडणारे नाही. कंत्राटदारांमार्फतच गुणवत्तेचे काम करून घेणे कधीही सोयीचे आहे.
आयुक्तांकडून खरडपट्टी
मागील महिन्यात मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी रस्त्यांची कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची यादी तयार करा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते. मागील पंधरा दिवसांमध्ये अधिकाऱ्यांनी यादीच तयार केली नाही. शुक्रवारी आयुक्तांनी या मुद्यावर अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची चर्चा आहे.
कारवाईची मागणी
शहरातील खराब रस्त्यांना मनपातील कंत्राटदार आणि अधिकारी जबाबदार आहेत. अनेक महापालिकांनी खराब रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांवर फौजदारी कारवाई सुरू केली आहे. महापालिकेनेही असेच धाडसी पाऊल उचलून गुळगुळीत रस्ते तयार करून द्यावेत, अशी मागणी आ. इम्तियाज जलील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.