Pune: उरुळी कांचन परिसरात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:07 PM2024-06-25T13:07:23+5:302024-06-25T13:08:17+5:30

उरुळी कांचन ( पुणे ) : येथील गोबर गॅस टिळेकर मळा परिसरामध्ये मागील चार दिवसांपूर्वी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. ...

Leopard rampage in Uruli Kanchan area, fear spread among farmers | Pune: उरुळी कांचन परिसरात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

Pune: उरुळी कांचन परिसरात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

उरुळी कांचन (पुणे) : येथील गोबर गॅस टिळेकर मळा परिसरामध्ये मागील चार दिवसांपूर्वी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला होता. या बिबट्याने तीन शेळ्या व कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. परत त्याच परिसरात त्या ठिकाणी रविवारी बिबट्या दिसला.

सध्या पेरणीचे दिवस चालू आहेत. शेतकरी वर्ग आपल्या शेतामध्ये मशागतीची कामे करून पेरणी करत आहेत. परंतु दिवसा व रात्री बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन घडत आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकवस्तीमध्ये बिबट्या वावरत असल्यामुळे कामगार, मजूर वर्ग व शेतकरी शेतीसाठी शेतात जाण्याचे टाळत आहे.

शेतकरी अनिल टिळेकर यांना रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्या दिसला. त्यांनी काही शेतकऱ्यांना त्वरित फोनद्वारे सांगितले. त्यांनी वन अधिकारी यांनाही माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी संदीप कांचन म्हणाले की, सध्या शेतामध्ये मका, ऊस लागवड शेतीची कामे सुरू आहेत. परंतु भीतीने कामगार वर्ग कामावर येत नाही. वनविभागाने त्वरित पिंजरा लावण्याची गरज आहे.

 

Web Title: Leopard rampage in Uruli Kanchan area, fear spread among farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.