विठ्ठलवाडी परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:06+5:302021-02-09T04:12:06+5:30
मागील काही दिवसांपासून नांदुर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी परिसरात उसाची तोड सुरू आहे. बिबट्यांचे सध्याचे वास्तव्य असणारा ऊस काढल्यामुळे बिबट्याचा अधिवास ...
मागील काही दिवसांपासून नांदुर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी परिसरात उसाची तोड सुरू आहे. बिबट्यांचे सध्याचे वास्तव्य असणारा ऊस काढल्यामुळे बिबट्याचा अधिवास नष्ट होऊ लागला आहे. त्यामुळे बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी इतरत्र दिवसाही फिरत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. विठ्ठलवाडी येथे काही दिवसांपूर्वी गुलाब कोंडाजी चिखले यांच्या शेळीवर बिबट्याने पहाटे हल्ला करून तिला ठार केले होते. त्यानंतर सोपान नथू चिखले यांच्या घराला संरक्षण भिंत आहे. त्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून बिबट्याने अंगणातील कुत्रे ठार केले आहे. तसेच दत्तू जानकू भेके हे साडेपाच वाजता शेळ्या चारून घरी घेऊन येत होते. त्यांना डिंभे डाव्या कालव्यानजीक बिबट्या दिसून आला. त्यामुळे बिबट्या दिवसाही या भागात मुक्त संचार करू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.