वरंध घाटात बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:09 AM2021-06-20T04:09:46+5:302021-06-20T04:09:46+5:30
भोर: भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. यामुळे कोकणात ...
भोर: भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात पर्यटकांना बिबट्याचे दर्शन झाले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. यामुळे कोकणात जाणारे नागरिक व पर्यटकांत भीतीचे वातावरण आहे. वनविभागाकडून घाटात नागरिकांत जनजागृती तसेच पेट्रोलिंग केले जात आहे.
भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाटात दोनतीन दिवसांपूर्वी
पर्यटकांना घाटातील डोंगराकडे जाताना महाड हद्दीत बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर सर्वत्र फिरत आहे. भोर शहरात व तालुक्यात बिबट्याबाबत एकच चर्चा सुरू आहे. मात्र, यामुळे कोकणात जाणारे चाकरमानी व फिरायला जाणाऱ्या पर्यटकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोसळणारा धो धो पाऊस आणी हिरव्यागार डोंगर दऱ्यातून फेसाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक येतात. मात्र, बिबट्या दिसल्याने नागरिक व पर्यटकांत भीतीचे वातावण निर्माण झालेले आहे. वरंधा घाटामध्ये बिबट्या आढळून आल्याने पर्यटकांनी व नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून, याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. वनविभागाकडून घाटात पेट्रोलिंग सुरू आहे. बिबट्या एका जागेवर थांबत नाही. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय मिसाळ यांनी सांगितले.