जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; रोहोकडी, पिंपळगाव जोगा येथे बिबट हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:28 IST2025-02-02T18:27:39+5:302025-02-02T18:28:25+5:30

अचानक पहाटे ४:४५ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.

Leopard terror continues in Junnar taluka; Leopard attack in Rohokadi, Pimpalgaon Joga | जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; रोहोकडी, पिंपळगाव जोगा येथे बिबट हल्ला

जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत कायम; रोहोकडी, पिंपळगाव जोगा येथे बिबट हल्ला

ओतूर : जुन्नर तालुक्यात रविवारी (दि. २) पिंपळगाव जोगा येथील सुनील बबन निमसे, वय ४२ वर्ष हे घराबाहेर असलेल्या शेडमध्ये झोपले असताना, अचानक पहाटे ४:४५ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्यांना किरकोळ जखमी केले.

रोहोकडी येथील अभय विलास घोलप वय १९ व चुलते रखमा सखाराम घोलप वय ६१ यांच्यावर विद्युत पंप चालू करण्यासाठी मोटारसायकलवरून जात असता, सकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. जखमी व्यक्तींना तत्काळ ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेऊन पुढील उपचारासाठी मंचर येथील ग्रामीण रुग्णालय नेण्यात आले.

ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी तत्काळ वनविभागाचे पथक दाखल होऊन पिंपळगाव जोगा वनपाल मनीषा काळे, वनरक्षक रेखा धूम, आंबेगव्हाण वनपाल रूपावली जगताप, वनरक्षक वैभव वाजे, किशन खरोडे वनरक्षक व्ही.ए.बेले, फुलचंद खंडागळे, ऋषिकेश गायकवाड, फिरोज पठाण रेस्क्यू टीम यांनी हल्ला झालेल्या ठिकाणी पाहणी करून तत्काळ पिंजरा लावण्यात येईल, असे सांगितले, तसेच रेस्क्यू टीम यांनी बिबट वन्य प्राण्याबद्दल बिबट प्रवण क्षेत्रातील नागरिकांना माहिती देऊन स्वसंरक्षणार्थ उपाययोजना सांगून जनजागृती करीत आहेत, तरी वनविभागाकडून असे आवाहन करण्यात येते की, पहाटे उघड्यावर शौचास जाऊ नये, तसेच रात्री उघड्यावर झोपू नये व बिबट प्रवण क्षेत्रातून वाहनाद्वारे जात असताना वाहनाचे हॉर्न मोठ्याने वाजविणे, जेणेकरून रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेले वन्य प्राणी त्याची जागा बदलतील, असे वनविभागाकडून सूचित करण्यात आले आहे.

Web Title: Leopard terror continues in Junnar taluka; Leopard attack in Rohokadi, Pimpalgaon Joga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.