पुणे जिल्ह्यातील आणे परिसरात एकामागोमाग जाताना बिबटे कॅमेऱ्यात कैद; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 05:11 PM2024-03-23T17:11:06+5:302024-03-23T17:12:16+5:30
वनविभागाने आणे पठारावरील मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर, हेच बिबटे तहान भूक भागवण्यासाठी माणसावर हल्ले करतील यात शंका नाही...
आळेफाटा (पुणे) : जुन्नर तालुक्यात बिबट्यांची दहशत काही संपत नाही. उंब्रज येथे एका बालकावर हल्ला केल्यानंतर वनविभागाने सलग तीन दिवस लावलेल्या पिंजऱ्यात तीन बिबटे अडकले. ही घटना ताजी असताना नारायणगावच्या लोकवस्तीत एक नव्हे तर तीन बिबट्यांचा कळप रस्त्यावर फिरत होता.
अशातच आज पुन्हा २ बिबट ऐटीत एकामागोमाग जाताना मोबाइल मध्ये कैद झाले. जिथे आता जनावरांना चारा आणि माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे, अशा आणे पठारावर एकाच वेळी दोन बिबट्यांचे दर्शन होणे हे दुर्मिळ आहे. तेही शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती अशा दिमाखात फिरताना दिसत आहे.
वनविभागाने आणे पठारावरील मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर, हेच बिबटे तहान भूक भागवण्यासाठी माणसावर हल्ले करतील यात शंका नाही.
Pune: आणे परिसरात एकामागोमाग जाताना बिबटे कॅमेऱ्यात कैद#leopardpic.twitter.com/HMeLaI53a2
— Lokmat (@lokmat) March 23, 2024