जुन्नर वनविभागात बिबट्याने आतापर्यंत घेतले ३६ जणांचे बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:17 AM2022-11-03T10:17:09+5:302022-11-03T10:19:39+5:30

वनविभागाकडील नोंदीचा वेध घेता जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३६ जणांनी बिबट्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे...

Leopards have killed 36 people in Junnar Forest Division so far | जुन्नर वनविभागात बिबट्याने आतापर्यंत घेतले ३६ जणांचे बळी

जुन्नर वनविभागात बिबट्याने आतापर्यंत घेतले ३६ जणांचे बळी

googlenewsNext

जुन्नर (पुणे) : जांबूत येथे महाविद्यालयीन युवतीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतरही जुन्नर वनविभागात पशुधनावरील हल्ले सुरूच आहेत. जुन्नर वनविभागात २२ वर्षांपूर्वी बिबट-मानव संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर अनेकदा बिबट्यांच्या मानवी तसेच पशुधनांवरील हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाकडील नोंदीचा वेध घेता जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत ३६ जणांनी बिबट्यांच्या हल्ल्यात आपला जीव गमावला आहे. यात बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत १२२ जण बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये जखमी झाले असून, जवळपास ९ हजार जनावरांचा बिबट्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

मानवी मृत्यू आणि पशुधनाच्या बळींमुळे कुटुंबीय तसेच शेतकऱ्यांना आतापर्यंत शासनाला जवळपास ७ कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी लागली आहे. दरम्यान, ऊसतोडणीला आता सुरुवात होत असताना, उसाच्या लपणात राहणारे बिबटे आता काही प्रमाणात सैरभैर होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. अशावेळी ऊसतोडणी कामगारांनीदेखील पुरेशी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात येत आहे. लोकवस्तीत, शैक्षणिक संकुले, निवासी संकुले या भागात बिबट्या थेट प्रवेश करू लागल्याने आवश्यक ते खबरदारीचे उपाय वनविभागाने राबविण्याची गरज आहे.

जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात जुन्नरसह खेड, आंबेगाव, शिरूर या चार तालुक्यांचा समावेश आहे. या भागात धरणांच्या विपुलतेने असलेल्या सिंचन सुविधांमुळे मोठ्या प्रमाणात ऊसशेती होते. उसाच्या फडात प्रजनन आणि संरक्षित लपणाची सोय बिबट्यांसाठी अनुकूल असल्याने बिबट्यांचा मोठा संचार या भागात असल्याचे पाहायला मिळते. शेतकरीदेखील शेतशिवारात घरे बांधून राहतात, त्यांची पाळीव जनावरेही तेथे असतात. त्यामुळे बिबट्याला सहज उपलब्ध होणाऱ्या पशुधनाच्या रूपातले खाद्य सहजगत्या मिळत असल्याने बिबटे जंगलाऐवजी उसात स्थिरावल्याचे चित्र आहे.

Web Title: Leopards have killed 36 people in Junnar Forest Division so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.